Sanjay Raut On Modi : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर झाल्यानंतर देशाची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलेली असून भाजपला (BJP) तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएमधील (NDA) इतर घटक पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी देखील सरकार स्थापना करण्याची तयारी करत असल्याची चर्चा जोराने सुरु आहे.
यातच आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य करत पंतप्रधान पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) दुसऱ्या पर्यायचा विचार करत असल्याने मोदींना पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही असं म्हणाले आहे. यानंतर पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे यावेळी नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही. 2014 आणि 2019 मध्ये मोदी 56 इंचांची छाती काढून ज्या रुबाबात चालत होते मात्र आता ते चित्र दिसत नाही. त्यांची बॉडी लॅंग्वेज बदलेली आहे तसेच भाषाही नरमली आहे याचा कारण म्हणजे आता त्यांना पक्षातून विरोध होत आहे. मला माहिती मिळाली आहे की, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही विरोध आहे. असं संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले, माहितीनुसार, मोदींना संघाचा विरोध आहे कारण निवडणुकीत मोदींचा पराभव झाला आहे आणि एक पराभूत माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे. भाजप आणि एनडीएने ही निवडणूक मोदींच्या नेतृत्वात लढवली होती मात्र त्यांना बहुमत मिळालं नाही यामुळे आता भाजप मित्र पक्षांच्या कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करत आहे. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वरिष्ठ नेतृत्व इतर पर्याय शोधत आहे.
संघ कोणाला पंतप्रधान करायचं यावर चर्चा सुरु आहे मात्र पंतप्रधान कोणाला करायचं हा जरी भाजपाचा प्रश्न असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो असं देखील संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
…तर यूपीमध्ये भाजपने ‘या’ 11 जागा गमावल्या असत्या, इंडिया आघाडीचा बसपाने केला खेळ खराब
4 जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला 292 तर इंडिया आघाडीला 232 जागा मिळाले आहे तर भाजपने 240 जागा जिंकले आहे आणि काँग्रेसला 99 जागा मिळाले आहे. यामुळे तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी भाजपला एनडीएच्या इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.