‘आमच्या नादाला लागू नका’, संजय राऊतांचा राणांना थेट इशारा

‘आमच्या नादाला लागू नका’, संजय राऊतांचा राणांना थेट इशारा

Sanjay Raut On Navneet Rana : ‘त्यांचा राजकारणाशी संबंध आलेला आहे का? आमच्या भूमिकेवर कोणी ऐऱ्या गैर्याने बोलावं हे बरोबर नाही’ अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर केली आहे. आज संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करत मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबद्दल माहिती दिली.

संजय राऊत म्हणाले, आज स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुका आहेत. त्यात शिक्षक मतदार संघ आहे, पदवीधर मतदार संघ आहे. मुंबईतले शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ शिवसेना लढवत आहे. पदवीधर मतदार संघासाठी आमचे सहकारी अनिल परब उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. नाशिक शिक्षक मतदार संघ देखील शिवसेना लढत आहे संदीप गुळवे हे आमचे तिथले उमेदवार आहेत. कोकणामध्ये सुद्धा निवडणुका आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

तर निवडणूक आयोगावर बोलताना संजय राऊत म्हणाले, आज देशात इलेक्शन कमिशनबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. ती एक संविधानिक संस्था आहे पण ज्या पद्धतीने वारंवार आम्हाला निवडणूक आयोगासमोर हात जोडावे लागत आहेत आणि आयोग देखील ऐकलं न ऐकलं करत आहे यामुळे सध्या अनेकांच्या मनात निवडणूक आयोगाबद्दल शंका निर्माण होत असल्याची टीका संजय राऊतांनी केली.

प्रधानमंत्री निवडणुकांच्या काळात ध्यान करतात आणि सगळे कॅमेरे त्यांच्याकडे जातात हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे. देशाचे गृहमंत्री दीडशे कलेक्टर आणि टीएमसींना निर्देश देत आहेत हे कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन आहे आणि एक्झिट पोल च्या माध्यमातून लोकांच्या मनावर प्रेशर केलं जात आहे हे देखील कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन आहे मात्र आयोगाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने भाजपच्या एका शाखेप्रमाणे निवडणूक आयोग काम करत असल्याचा दिसून येत आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आपल्या मैदानातच विरोध, आता कुठे करणार आंदोलन?

तर नवनीत राणा यांच्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले, काय सकाळी सकाळी नाव घेत आहेत त्यांचा राजकारणाशी संबंध आलेला आहे का? उद्धव ठाकरे 25 वर्षापेक्षा जास्त काळ या सेनेचा नेतृत्व करत आहेत अशा पक्षांच्या भूमिका वरती कोणी ऐऱ्या गैर्याने बोलावं हे बरोबर नाही. तुमचं तुम्ही बघा तुमच्या निवडणुका तुम्ही लढा ही लोकशाही आहे. आमच्या नादाला लागू नका आमचे भूमिका काय आहे हे आम्ही ठरवून त्याबाबतीत पक्षप्रमुख निर्णय घेतील. असं देखील संजय राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube