मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आपल्या मैदानातच विरोध, आता कुठे करणार आंदोलन?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आपल्या मैदानातच  विरोध, आता कुठे करणार आंदोलन?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमधील उपोषणाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार होते मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांचे सहकारी डॉ. रमेश तारख, किरण तारख सह अन्य गावकऱ्यांचा उपोषणाला विरोध होत आहे. जरांगे पाटीलांच्या उपोषणाला परवानगी देवू नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखा ही बिघडलाय. या जातीय तेढातून भांडणे होऊन, कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून जरांगे पाटीलांच्या उपोषणाला परवानगी देवू नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube