…तर यूपीमध्ये भाजपने ‘या’ 11 जागा गमावल्या असत्या, इंडिया आघाडीचा बसपाने केला खेळ खराब

…तर यूपीमध्ये भाजपने ‘या’ 11 जागा गमावल्या असत्या, इंडिया आघाडीचा बसपाने केला खेळ खराब

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) महाराष्ट्रानंतर सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशमध्ये बसला आहे. आता एक नवीन आकडेवारी जाहीर झाली आहे. या नवीन आकडेवारीनुसार, यूपीमधील तब्बल 11 जागांच्या निकालावर बसपचा प्रभाव होता ज्यामुळे भाजपला विजय मिळवता आला. जर या ठिकाणी बसपचा प्रभाव नसता तर सहज इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असता.

उत्तर प्रदेशच्या भदोही लोकसभा जागेवर इंडिया आघाडीकडून टीएमसीचे ललितेशपती त्रिपाठी निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात भाजपचे विनोदकुमार बिंड होते. विनोदकुमार बिंड यांना 459982 मते मिळाली तर टीएमसीच्या त्रिपाठी यांना 415910 मते मिळाली. येथे विजय-पराभवाचा फरक 44072 होता आणि बसपा उमेदवार हरिशंकर यांना 155053 मते मिळाली.

बसपने कोणत्या जागांवर सपा-काँग्रेसचा खेळ बिघडवला?

फतेहपूर सिक्री

लोकसभा फतेहपूर सिक्री लोकसभेतून भाजपचे राजकुमार चहर यांना 445657 मते मिळाली तर काँग्रेसचे रामनाथ सिंह यांना 402252  मते मिळाली आणि बसपाचे उमेदवाराला 120539  मते मिळाली मात्र येथे पराभवाचे अंतर 43405  इतका होता.

 मेरठ  

मतदारसंघात भाजपचे अरुण गोविल यांना 546469 मते मिळाली तर समाजवादी पार्टीच्या सुनीता वर्मा यांना 535884 मते मिळाली आणि बसपाला 870225 मते मिळाली. येथे विजय आणि पराभवाचा फरक 10585 होता

 अकबरपूर

अकबरपूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून देवेंद्र सिंग निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना 517423 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या सपाचे राजाराम पाल यांना 473078 मते मिळाली आणि बसपा उमेदवाराला 73140 मते मिळाली. या जागेवर विजय किंवा पराभवाचे अंतर 44345 होता.

 अलिगड  

अलिगड लोकसभा निवडणुकीत भाजपचे सतीश कुमार गौतम यांना 501834  मते मिळाली तर सपा उमेदवार बिजेंद्र सिंह 486187 मते मिळाली आणि या जागेवर विजय किंवा पराभवाचे अंतर 15647 मतांचा होता तर या जागेवर बसपा उमेदवार हितेंद्र कुमार यांना 123929 मते मिळाली.

  अमरोहा  

अमरोहा लोकसभा निवडणुकीत भाजपचे कंवरसिंह तन्वर यांना 476506 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार दानिश अली यांना 447836 मते मिळाली. या जागेवर विजयाचे अंतर 28670 इतके होते. तर बसपाचे उमेदवार मुजाहिद हुसेन यांना 164099 मते मिळाली.

 बनसगाव  

बनसगाव लोकसभा निवडणुकीत भाजपचे कमलेश पासवान यांना 428693 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसचे सदल प्रसाद यांना 425543 मते मिळाली आणि बसपा उमेदवाराला 64750 मते मिळाली. येथे विजय किंवा पराभवाचा फरक 3150 मतांचा होता.

 बिजनौर  

बिजनौर लोकसभा मतदारसंघातून आरएलडीचे चंदन चौहान यांना 404493 मते मिळाली तर समाजवादी पक्षाचे उमेदवार दीपक यांना 366985 मते मिळाली. या जागेवर विजय किंवा पराभवाचा फरक 37508 मतांचा होता आणि येथे बसपा उमेदवार विजेंदर सिंह यांना 218986 मते मिळाली.

 देवरिया  

देवरिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे शशांक मणी यांना 504514 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार अखिलेश प्रताप सिंह यांना 469699मते मिळाली आणि बसपाला 45564 मते मिळाली. या जागेवर पराभवाचे अंतर 34842 मतांचा होता.

फारुखाबाद  

फरुखाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुकेश राजपूत यांना 487963 मते मिळाली तर समाजवादी पक्षाचे नवल किशोर शाक्य यांना 485285 मते मिळाली आणि बसपाच्या उमेदवार क्रांती पांडे यांना येथे 45390 मते मिळाली तर या जागेवर पराभवाचे अंतर केवळ 2678 होते.

फडणवीस यांच्या भेटीपूर्वी विनोद तावडेंची अमित शहांच्या घरी हजेरी! महाराष्ट्र भाजपामध्ये होणार मोठा बदल?

मिर्झापूर

मिर्झापूर लोकसभा मतदारसंघात अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांना 471631 मते मिळाली तर समाजवादी पक्षाचे रमेश चंद यांना 433831 मते मिळाली आणि बसपाला 144446 मते मिळाली आणि येथे विजय आणि पराभवाचा फरक 37810 होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज