Download App

राज ठाकरेंचं मतपरिवर्तन अधुनमधून सुरू असतं…; बिनशर्त पाठिंब्यावरून पवारांची टीका

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठींबा दिला. नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. त्यावर राज ठाकरेंवर जोरदार टीका होत आहे. आता शरद पवारांनी (Sharad Pawar) यावर प्रतिक्रिया दिली.

PM मोदींची सभा झाली… पण भाजप अन् मुनगंटीवारांना चंद्रपूर अजूनही सोपं नाही! 

गेल्या काही वर्षातील अनुभव लक्षात घेता राज ठाकरेंचं मतपरिवर्तन हे अधुनमधू्न सुरू असतं, अशी खोचक टीका पवारांनी केली.

महायुतीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी पवारांना राज ठाकेरंनी घेतलेल्या भूमिकेविषयी विचारले असता पवार म्हणाले, राज ठाकरेंचं मतपरिवर्तन झालं आहे. अनेकदा अधूनमधून त्याचं मतपरिवर्तन होत असतं. त्यांचा गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता, त्यावेळची स्थिती त्यांना योग्य होती. त्यासंबंधी ते मुक्तपणे आपली मतं मांडत असतात. ते मांडत राहतील, असं पवार म्हणाले.

कुणीही घाबरण्याची गरज नाही; माझ्याकडे अनेक योजना; मोदींनी सांगितलं 2047 पर्यंत काय काय होणार 

पुढं बोलतांना पवार म्हणाले, मविआच्या बैठकीत विशिष्ट कार्यक्रम आणि निश्चित उद्दिष्ट घेऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे ठरले. केवळ शरद पवार गटालाच नाही तर राज्यातील सर्वच पुरोगामी लोकांना चांगले दिवस येतांना दिसत आहेत. महाराष्ट्रात विरोधकांनी स्थापन केलेल्या आघाडीविषयी सर्वसामान्यांना आस्था आहे. तसंच महाविकास आघाडी अजूनही वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यास तयार असल्याचेही शरद पवार म्हणाले.

शशिकांत शिंदे याचं नाणं खणखणीत
शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवी वासी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिंदेवर केला. याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, मी शिंदेंना याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असं सांगितलं. ते उद्याच पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली बाजू मांडतील. निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप होत असतात. पण, शशिकांत शिंदे याचं नाणं खणखणीत आहेत.

 

follow us