PM मोदींची सभा झाली… पण भाजप अन् मुनगंटीवारांना चंद्रपूर अजूनही सोपं नाही!

PM मोदींची सभा झाली… पण भाजप अन् मुनगंटीवारांना चंद्रपूर अजूनही सोपं नाही!

गत लोकसभा निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रात 25जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 23 जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. दोन ठिकाणी पराभव झाला. पहिला बारामतीमध्ये. तिथे राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या (BJP) कांचन कुल (Kanchan Kul) यांचा पराभव केला. तसं बारामती हा राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला होता. त्यामुळे येथील पराभवाचा भाजपला धक्का बसला नाही. भाजपला दुसऱ्या पराभावाचा मात्र चांगलाच धक्का बसला होता. तो होता चंद्रपूरचा. चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असलेल्या हंसराज अहिर यांना काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी अस्मान दाखवले. राज्यात काँग्रेसने लोकसभेची एकच जागा जिंकली.ती म्हणजे चंद्रपूरची. (BJP has nominated Sudhir Mungantiwar and Congress has nominated MLA Pratibha Dhanorkar from Chandrapur Lok Sabha constituency.)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा चंद्रपूर आणि यवतमाळ अशा दोन जिल्ह्यांत पसरला आहे. राजूरा, चंद्रपूर, बल्लापूर आणि वरोरा या चंद्रपूरमधील चार आणि वणी, अर्णी या यवतमाळमधील दोन विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो. अहिर येतात चंद्रपूर जिल्ह्यातून. पण यवतमाळमधील दोन विधानसभा मतदारसंघात अहिर हे आघाडीवर राहिले. तर स्वतःच्या जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात ते पिछाडीवर राहिले. तेव्हा सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हेच चंद्रपूरचे पालकमंत्री होते. त्यांच्या स्वतःच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातही ते अहिर यांना आघाडी मिळवून देऊ शकले नव्हते. इथेच आपल्याच पक्षातील नेत्यांनी तर आपल्याविरोधात कट केला नाही ना, अशी शंका अहिर यांना आजही येते.

कुणीही घाबरण्याची गरज नाही; माझ्याकडे अनेक योजना; मोदींनी सांगितलं 2047 पर्यंत काय काय होणार

आता पाच वर्षांच्या काळात अहिर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करत त्यांचे पुनर्वसन झाले आहे. तर नको, नको म्हणतानाही भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीच्या घोड्यावर बसवलेले आहे. एक प्रकारे काँग्रेसच्या हातात गेलेला मतदारसंघ पुन्हा ताब्यात घ्या, असा संदेश त्यांना दिला असल्याचे बोलले जाते. त्याचवेळी काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. या दोघांमध्येही थेट आणि काट्याची लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. कागदावर मुनगंटीवार यांची बाजू स्ट्राँग आहे. मतदारसंघातील सहापैकी चार आमदार महायुतीचे आहेत. तर दोन आमदार काँग्रेसचे आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गजांच्या प्रचारसभा पार पडल्या आहेत.

पण मुनगंटीवार यांच्यासाठी ही निवडणूक दिसते तेवढी सोपी नाही. मागच्या अनेक वर्षांमध्ये केंद्राचा एकही लक्षवेधी प्रकल्प जिल्ह्यात आला नाही याची तरुणांमध्ये कमालाची नाराजी दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाचा अभाव आहे. शेतीवर एकही प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे शेतकरीही काहीसे नाराज आहेत. प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. कोळसा खाणी आणि इतर प्रकल्पांमुळे बेघर झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही रेंगाळत आहेत. याशिवाय गटातटाचे राजकारणही चिंतेच प्रश्न आहे. 2019 च्या पराभवातून हंसराज अहीर सावरलेले नाहीत. अप्रत्यक्षपणे ते मुनगंटीवार यांनी विरोधात काम केल्यामुळे भाजपाचा पराभव झाला, अशी खदखद नेहमी व्यक्त करतात. यावेळी अहीर प्रभावीपणे प्रचारात दिसत नाहीत. मुनगंटीवारांनी भाऊ-बहिणीचा दाखला देत केलेले वक्तव्य त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. काँग्रेसने याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न केला.

Lok Sabha Election: मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा ; आरक्षणाबाबत ठेवली मोठी अट

काँग्रेससाठी ही निवडणूक किती सोपी आणि किती अवघड?

2019 मध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी 44 हजारांच्या मताधिक्याने ही जागा जिंकली होती. त्यापूर्वी काँग्रेसने विनायक बांगडे यांना तिकीट दिले होते. पण काँग्रेसने अखेरच्या क्षणी धानोरकरांना मैदानात उतरवले. त्यामुळे त्यांच्यासाठी सहानुभूती होती. आता बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर तशी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न प्रतिभा धानेारकर करीत आहेत. पण त्यांनी आमदारही म्हणून स्वतःला राजकारणात सिद्ध केले आहे ही गोष्ट नाकारुन चालणार नाही. दमदार उमेदवार म्हणून त्यांनी प्रचारात मुसंडी घेतली आहे. जात फॅक्टरचाही फायदा धानोरकर यांना होईल असे सांगितले जाते.

धानोरकर यांनी स्वतःला सिद्ध केले असले तरीही गतवेळी हंसराज अहीरांबाबत अँटीइन्कमबन्सी होती. यावेळी मुनगंटीवार यांच्यारुपाने नवीन चेहरा आहे. त्यामुळे अँटीइन्कमबन्सी हा फॅक्टर मागे पडतो. सोबत गटातटाच्या राजकारणाचाही विचार करावा लागणार आहे. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार या आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. पण प्रतिभा धानोरकर तिकीट मिळविण्यात यशस्वी ठरल्या. त्यामुळे वडेट्टीवारांनी चंद्रपूरऐवजी गडचिरोली- चिमूरमध्ये जादा लक्ष घातलं आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुभाष धोटे यांच्या शिष्टाईने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र होते, मात्र, चंद्रपुरातील एका सभेनंतर वडेट्टीवार प्रचारात दिसले नाहीत.

वंचित आणि मुस्लीम मते कोणाकडे जाणार?

चंद्रपूर मतदारसंघातून सध्या 15 उमेदवार रिंगणात आहेत. यात गतवेळी एक लाख 20 हजार मते घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीचाही समावेश आहे. गतवेळी वंचितने राजेंद्र महाडोळे यांना मैदानात उतरवलं होतं. यंदा राजेश बेले यांना तिकीट दिले आहे. पण त्यांचा प्रचारात फारसा प्रभाव पाडताना दिसत नाहीत. वंचितचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या दोन सभांचा किती प्रभाव पडतो, हे बघण्यासारखे आहे. याशिवाय अनुसूचित जाती व मुस्लिम समाजाची मते कोणाच्या बाजूने जातात हे बघण्यासारखे आहे. सध्या भाजप विकासाचा दृष्टीकोन मांडत आहे तर काँग्रेस विकासाची हमी देत आहे. आता यामध्ये मतदारांना कोण भावते, हे पाहणे रंजक असेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज