Lok Sabha Election: मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा ; आरक्षणाबाबत ठेवली मोठी अट
Akhil Bhartiya Maratha Mahasangh support Mahayuti for Lok Sabha Election: मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वार वाहतंय. कुणी या पक्षात तर कुणी त्या पक्षात हे सुरु असताना, कोण कुणाला पाठिंबा देतय हेही निवडणुकीच्या काळात महत्वाचं मानलं जात. आज अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीला (Akhil Bhartiya Maratha Mahasangh ) पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. महासंघाने पाठिंबा देताना महायुतीसमोर <strongमराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण : EWS मधून मिळणारा लाभ बंद होणार?(Martha Reservation) स्वतंत्रपणे ओबीसी प्रवर्गातून (0BC reservation) आरक्षण देण्याची महत्त्वाची अट ठेवली आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट, पुष्कर जोग साकारणार भूमिका
भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. यावेळी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजप आमदार प्रसाद लाड राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, गजेंद्र भासले राष्ट्रीय संघटक यांच्यासह भाजप आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जानकरांसाठीची ‘चार्टर्ड प्लेन’ पॉलिसी सफल; माढ्याची ‘गुड न्यूज’ संध्याकाळी सात वाजता सांगणार
यावेळी बोलताना दिलीपदादा जगताप म्हणाले, अखिल भारतीय मराठा महासंघाने आजच नाही तर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या काळातही युतीला पाठिंबा दिलेला आहे. तसेच 1985, त्यानंतर 1995, 2004, 2009 2014 या निवडणुकांतही महासंघाने पाठिंबा दिलेला आहे. या निवडणुकीमध्येही मराठा महासंघाने पाठिंबा दिल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो असंही आमदार लाड म्हणाले.
काय म्हणाले आशिष शेलार?
गेली 125 वर्षांपासून अखिल भारतीय मराठा महासंघ ही संघटना एक पालक संघटना म्हणून काम करत आहेत. संघर्ष, संवाद आणि समन्वयाने ही संघटना काम करत आहे. अशा संघटनेचे समर्थन मिळाल्याने आम्ही आभारी आहोत. तसंच, आपल्या मागणीप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोनवेळा चर्चा झाली आहे, अशी माहितीही शेलार यांनी यावेळी दिली. याचबरोबर भाजपचीही भूमिका ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची आहे आणि ती तुमचीही भूमिका आहे असं म्हणतं शेलार यांनी दिलीपदादा जगताप यांचे आभार मानले. तुमची मागणी योग्य असून आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू आणि लवकरच महायुतीच्या नेत्यांसोबत यावर बैठक घेऊ असं आश्वासनही शेलार यांनी यावेळी दिलं.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण
जगताप म्हणाले, आम्ही मागच्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला म्हणजे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आलो आहोत. आम्ही पाठिंबा दिल्याच्या बदल्यात काही मागितले नाही. मात्र, यावेळी आमची एक मागणी आहे. आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत निदर्शनं केली. आमचा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. हे लक्षात घेऊन आपण आरक्षणावरील 50% ही मर्यादा काढून मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी दिलीपदादा जगताप यांनी यावेळी आशिष शेलार यांच्याकडे केली. तसंच, गेली 1993 पासून या मागणीचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यावं असही जगताप यावेळी म्हणाले.
आमचा पाठिंबा असला की सरकार येतेच
आम्हाला स्वातंत्र्य प्रवर्ग तयार करून ओबीसीमधूनच आरक्षण द्या. मात्र, आम्ही एकटेच नसून आमच्यासोबत राजपूत समाज आहे, गुर्जर समाज आहे तर त्यांचाही विचार व्हावा असंही ते म्हणाले आहेत. गेली सहा ते सात महिन्यापासून महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु आहे की काय अशी परिस्थिती आहे. मात्र, आमची सुरुवातीपासून भूमिका आहे की, आम्ही मोठे भाऊ आहोत त्यामुळे लहान भावाच्या ताटातले काढून घेण्याची आमची भूमिका नाही असं स्पष्टीकरणही दिलीपदादा जगताप यांनी यावेळी दिलं. त्याचबरोबर, आमचा पाठिंबा असला की सरकार येतेच. त्यामुळे आपण आमची मागणी लावून धरा आणि आमचा हा विषय मार्गी लावा अशी विनंतीही दिलीपदादा जगताप यांनी यावेळी केली.
अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना आणि उद्देश काय?
अखिल भारतीय मराठा महासंघ ही सामाजिक संघटना १९८१ साली कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे . मराठा समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी .त्याचबरोबर सामाजिक दबावगट निर्माण व्हावा ही मुलभूत संकल्पना मराठा महासंघाची आहे. सध्या दिलीपदादा जगताप हे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.