जानकरांसाठीची ‘चार्टर्ड प्लेन’ पॉलिसी सफल; माढ्याची ‘गुड न्यूज’ संध्याकाळी सात वाजता सांगणार

  • Written By: Published:
जानकरांसाठीची ‘चार्टर्ड प्लेन’ पॉलिसी सफल; माढ्याची ‘गुड न्यूज’ संध्याकाळी सात वाजता सांगणार

नागपूर : माढ्यातील डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) धावाधाव करत माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांसाठी (Uttam Jankar) नियोजन केलेली खास चार्टर्ड प्लेन पॉलिसी जवळपास यशस्वी झाली आहे. फडणवीसांसोबत नागपूरमध्ये जवळपास तास-दीड तासांच्या चर्चेनंतर उत्तम जानकर पुन्हा माढ्याकडे रवाना झाले असून, माढा आणि सोलापुरात महायुतीला पाठिंबा देणार का, याबाबतचा निर्णय संध्याकाळी सात वाजता कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर जाहीर करणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे. फडणवीसांसोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचेही यावेळी जानकरांनी सांगितले. (Uttamrao Jankar Meet’s Devendra Fadnavis In Nagpur )

पडद्यामागचं राजकारण! भाजपात फडणवीस विरूद्ध सगळे; नेमकं काय घडतंय

माढ्याच्या ‘गुड न्यूज’ साठी सातपर्यंत वाट बघावी लागणार

धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे माढ्यात भाजपची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उत्तम जानकर हे धैर्यशिल मोहितेंना पाठींबा देण्याच्या तयारीत होते. मात्र तसं झालं तर महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फटका बसू शकतो अशी शक्यता लक्षात घेता भाजपकडून आणि फडणवीसांकडून जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांना तातडीने चार्टर्ड प्लेन नागपुरात बोलावण्यात आले होते. त्यानुसार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, शहाजीबापू पाटील आणि जयकुमार गोरे जानकरांसोबत फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. जानकर आणि फडणवीसांमध्ये सुमारे दीड तास खलबतं झाली.

Lok Sabha Election: भाजपला मोठा धक्का, अखेर धैर्यशील मोहिते यांनी तुतारी फुंकली !

काय म्हणाले जानकर? 

फडवीसांच्या भेटीनंतर उत्तमराव जानकरांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, फडवीसांसोबत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघाविषयी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या समस्या फडवीसांच्या कानावर टाकण्यात आल्याचे जानकर म्हणाले. यावेळी जानकरांना नाराजी दूर झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला पण. यावर त्यांनी थेट उत्तर न देता नाराजी दूर करण्यासाठीच फडणवीसांची भेट घेण्यासाठी आलो होतो असे उत्तर दिले. उमेदवारीचा विषय संपला असून, आम्ही मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न फडवीसांसमोर मांडल्याचे जानकर म्हणाले. फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली काय आश्वासने मिळाली हे सर्व कार्यकर्त्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

तुझे पार्सल एका रात्रीत बीडला पाठवतो; धैर्यशील मोहितेंचा पहिला वार राम सातपुतेंवर

जानकरांचा पाठिंबा नेमका कुणाला?

एकीकडे जानकरांनी फडणवीसांसोबतची भेट सकारात्मक झाल्याचे संकेत दिले आहेत. पण यावेळी त्यांनी त्यांचा पाठिंबा धोर्यशील मोहिते-पाटलांनी की, महायुतीला देणार याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे वेळापूर येथे कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर जानकर नेमका मोहिते पाटलांना की महायुतीला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज