लोकसभेचं कामकाज संपलं अन् महाराष्ट्राच्या वाघिणींनी घेतला आपटून-आपटून मारणाऱ्या दुबेंचा समाचार

लोकसभेचं कामकाज संपलं अन् महाराष्ट्राच्या वाघिणींनी घेतला आपटून-आपटून मारणाऱ्या दुबेंचा समाचार

Marathi MP warn BJP MP Nishikant Dubey at loksabha on conterversial statement about marathi peoples : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी मराठी खासदार दिल्लीत आहेत. त्यावेळी त्यांनी मराठी माणसांना बिहार, उत्तर प्रदेश, ओडिस आणि तामिळनाडूमध्ये आल्यावर आपटून आपटून मारू. असं वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंचा (Nishikant Dubey) चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.

दीड कोटींच्या खंडणीचा फटका! अहिल्यानगर LCB मध्ये खांदेपालट; आहेर यांची बदली, नवे पोलीस निरीक्षक कोण?

नेमकं काय झालं?

संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान लोकसभेच्या सभागृहाचं कामकाज 23 जुलै रोजी तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर बाहेर येताच कॉंग्रस खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी थेट मराठी माणसांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना गाठलं. दुबे लॉबीमध्ये येताच तिघींना त्यांना घेरलं अन् त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तुम्ही कुणाला आपटून आपटून मारणार? हे वागणं योग्य नाही. मराठी लोकांविरोधातली ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. असं म्हणत या तिघींनी निशिकांत दुबेंचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा देखील दिल्या आहेत. त्यावर दुबे यांनी तुम्ही तर माझ्या बहिणी आहात असं म्हणत हात जोडले आणि ते निघून गेले.

एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा…! लोढासोबत फोटो पोस्ट करत महाजनांचा पलटवार

नेमकं प्रकरण काय?

राज्यामध्ये पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं. त्यात उबाठा आणि मनसे यांनी एकत्र येत याविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हा जीआर मागे घेण्यात आला. पण त्यानंतर ही मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद काही संपलेला नाही. या दरम्यान मीरा भाईंदर येथे मनसे कार्यकर्त्यांनी एका अमराठी व्यावसायिकाला मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मारहाण केली होती.

जयंत पाटलांचा इशारा खरा ठरला! हर्षल पाटलांच्या आत्महत्येनंतर जुना VIDEO होतोय व्हायरल…

याप्रकरणानंतर मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद आणखी पेटला होता. त्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह मराठी माणसांवर निशाणा साधला होता. दुबे म्हणाले होते की, ठाकरे आणि मराठी माणसांना बिहार, उत्तर प्रदेश, ओडिस आणि तामिळनाडूमध्ये आल्यावर आपटून आपटून मारू.

खळबळजनक! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं दिवसाढवळ्या अपहरण, बेदम मारहाण करत पुलावरून फेकून दिलं

दुबेंच्या या विधानानंतर मराठी लोक आक्रमक झाले मुंबईत मोर्चा काढण्यात आला. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका सभेमध्ये दुबे यांना उत्तर दिले की, दुबे तुम्ही काय आम्हाला आपटून आपटून मारणार? मुंबईत या आम्हीच तुम्हाला समुद्रात डुंबून डुंबून मारू त्यानंतर आता संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी मराठी खासदार दिल्लीत आहेत. त्यावेळी त्यांनी दुबेंचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube