दीड कोटींच्या खंडणीचा फटका! अहिल्यानगर LCB मध्ये खांदेपालट; आहेर यांची बदली, नवे पोलीस निरीक्षक कोण?

Kiran Kumar Kabadi Appointed As Ahilyanagar LCB PI : अहिल्यानगर (Ahilyanagar News)स्थानिक गुन्हे शाखेमध्ये खांदे पालट करण्यात आले. नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (Dinesh Aher) यांच्या जागी आता किरण कुमार कबाडी यांची (Kiran Kumar Kabadi) नियुक्ती करण्यात आली आहे, तर आहेर यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश खुद्द पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी रात्री उशिरा काढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेर यांची बदली होणार, अशी चर्चा सुरू होती. बुधवारी यावरती शिक्कामोर्तब झाला.
खळबळजनक! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं दिवसाढवळ्या अपहरण, बेदम मारहाण करत पुलावरून फेकून दिलं
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची बदली
जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरण यांच्यामधील गुड उकलण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला सातत्याने येत असलेले अपयश हे वारंवार अधोरेखित होत होते. दरम्यान पोलीस निरीक्षक सोमनाथ घाडगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या समांतर एक विशेष पोलीस पथक तयार केले होते. या पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक अवैध धंदे यावरती पोलीस पथकाने छापा टाकून कोट्यावधींचा माल हस्तगत केला. तसेच अनेक आरोपींना देखील गजाआड केले.
खळबळजनक! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं दिवसाढवळ्या अपहरण, बेदम मारहाण करत पुलावरून फेकून दिलं
स्थानिक गुन्हे शाखेमध्ये भ्रष्टाचार
यात काही दिवसांपूर्वी पर्यवेक्षक दिन म्हणून आलेले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष खाडे यांनी या विशेष पथकाचे नेतृत्व करत अनेक दमदार कारवाया केल्या. यामुळे कुठेतरी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कमकुवत असल्याचे या माध्यमातून वारंवार दिसून आले. नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकाने एकांकडून दीड कोटीची खंडणी घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे, अशी देखील चर्चा रंगू लागली.
गुन्हेगारी कमी होणार का?
पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचे पाहताच काहीतरी खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यातच बुधवारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी किरण कुमार कबड्डी यांची नियुक्ती केली आहे, तर दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा ही कार्यान्वित असते. आता यामध्ये पोलीस अधीक्षकांनी नुकतच केलेला बदल पाहता जिल्ह्यामध्ये होणारे गुन्हेगारी कमी होणार का? तसेच अनेक गुन्हे जे उघडकीस आले नाही, याची उकल होणार का? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.