…म्हणून तमाम हिंदू बांधवांनो नाही तर तमाम देशभक्त म्हणतो; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

ही निवडणूक देशाची आहे. देश वाचवायचा आहे. त्यामुळे मी हिंदू बांधवांनो अस नाही तर देशभक्त बांधवांनो असं म्हणतो असं ठाकरे म्हणाले.

...म्हणून मी तमाम हिंदू बांधवांनो नाही तर देशभक्त म्हणतो; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

...म्हणून मी तमाम हिंदू बांधवांनो नाही तर देशभक्त म्हणतो; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election : मी कायम भाषणाची सुरूवात तमाम माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो अशी भाषणाची सुरूवात करत असतो. परंतु, ही निवडणूक देशाची आहे. देश वाचवायचा आहे. त्यामुळे मी देशभक्त बांधवांनो आणि मातांनो असं म्हणतो असा खुलासा (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंनी केला. ते प्रचार सभेत बोलत होते. तसंच, विरोधक टीका करतात की हे हिंदूत्व विसरले. मग तुम्हाला काय हिंदू देशभक्त नाहीत असं म्हणायचय का ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

 

पावटेचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये होते. त्यांच्या मनावर जास्तच ताण पडलाय. मध्ये कोणीतरी सांगितलं की, ते झोपतच नाही. झोपलं नाही किंवा झोप पूर्ण झाली नाही तर डॉक्टर सांगतात की, मेंदूवर परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्टासारखं बोलायला लागतात. मोदीजी तुम्हाला कल्पना नसेल, स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे, पावटेचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात असा थेट प्रहार उद्धव ठाकरेंनी मोदींवर केला.

 

आशीर्वादाचं कवच आहे

तेलंगणाची निवडणूक आणि तेलंगणाच्या भाषणात हे मला नकली संतान म्हणाले. मोदीजी मी माझं बर्थ सर्टिफिकेट मागितलं? आणि तेवढी तुमची लायकीपण नाही. तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाहीत. तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतारही नाहीत. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलं, पण मशाल बघा कशी पेटलेली आहे. त्यांना प्रश्न असा पडलाय, संपूर्ण फौज मोदींच्या बाजूने आहे, भाजपची तीनपाटापासूनची मोठी भांडीकुंडी वाजणारी त्यांच्याकडे आहेत, पण तरीही ते उद्धव ठाकरेला घाबरतात, कारण जनतेच्या रुपाने माझ्याभोवती शिवसेनाप्रमुख आणि माझ्या माँ साहेबांचं आशीर्वादाचं कवच आहे असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Exit mobile version