Maidaan New Song : अजय देवगणच्या मैदानचं नवं गाणं रिलीज; एआर रहमानने गायलं देशभक्तीपर गीत

Maidaan New Song : अजय देवगणच्या मैदानचं नवं गाणं रिलीज;  एआर रहमानने गायलं देशभक्तीपर गीत

Maidaan New Song : अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘मैदान’ (Maidaan ) हा चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात आता मैदान चित्रपटाचं नवं गाणं ( Maidaan New Song ) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जगप्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांनी या गाण्याला संगीत दिलं असून हे गाणं गायलं देखील त्यांनीच आहे. टीम इंडीया हैं हम असं या गाण्याचं नाव आहे.

महाकाय ‘एना जुलिया’ अ‍ॅनाकोंडाने घेतला जगाचा निरोप; ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये आढळला मृत

गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘मैदान’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी त्याचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. यानंतर चाहते खूप उत्साहित झाले. पण आता ती प्रतीक्षा संपली आहे.‘मैदान’ या चित्रपटात अजय देवगणची दमदार स्टाईल पाहायला मिळणार आहे. त्याचा हा लूक आत्तापर्यंतच्या पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे.

लोकसभेसाठी अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मंत्री, माजी मंत्र्यांची भलीमोठी यादी पाहाच

यामध्ये त्याने भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री प्रियामणी आणि गजराज राव हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपण ट्रेलरबद्दल बोललो तर ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. त्यात भारताची आपल्या अस्मितेची लढाई दाखवण्यात आली आहे, जी फुटबॉल खेळाडू ‘मैदानावर’ लढतात. यात अजय देवगणचा अभिनय मन जिंकणारा आहे. ट्रेलरने चाहत्यांना आणि प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस उतरत आहे.

या चित्रपटात फुटबॉलचा सुवर्णकाळ दाखवला : सिनेमाच्या कथेबद्दल बोललो तर ते फुटबॉलचा सुवर्ण काळ दाखवले आहे, यममध्ये भारताकडे सर्व ट्रॉफी होत्या. 1952 ते 1962 हा फुटबॉलचा सुवर्णकाळ यात दाखवण्यात आला आहे. फुटबॉलच्या इतिहासातील हा सुवर्णकाळ मानला जातो. हा एक चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज