महाकाय ‘एना जुलिया’ अॅनाकोंडाने घेतला जगाचा निरोप; ‘अॅमेझॉन’मध्ये आढळला मृत
World’s Largest Anaconda Snake Found Dead : जगातील सर्वात मोठा अॅनाकोंडा प्रजातातील साप मोठ्या मुश्किलीने सापडला. नॅशनल जिओग्राफिकची डिस्नी सिरीज ‘पोल टू पोल’च्या चित्रीकरणादरम्यान विल स्मिथच्या मदतीने या प्रजातीचा शोध घेतला गेला. ‘एना जुलिया’ असं या महाकाय सापाचं नामकरणही करण्यात आलं. परंतु, आता एक धक्कादायक बातमी आली आहे. एना जुलिया नावाचा हा साप अॅमेझॉनच्या जंगलात मृत अवस्थेत आढळून आला आहे.
Donald Trump : ठरलं तर! राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा ट्रम्प-बायडेन टक्कर; ‘या’ उमेदवाराची माघार
एना जुलिया या सापाला एक महिन्याआधी ब्राझीलच्या दक्षिण भागातील माटो ग्रोसो डो स राज्यातील बोनिटो या ग्रामीण भागात सापडला होता. येथील फॉर्मोसो नदीत हा विशालकाय साप आढळून आला होता. या सापाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, काही अहवालात मात्र सापाच्या मृत्यू पाठीमागे धक्कादायक कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अॅनाकोंडा सापाचे वजन जवळपास 440 पाउंड इतके होते. या सापाचे डोके एका माणसाइतके मोठे होते. आता असे काही अहवाल आले आहेत ज्यात दावा करण्यात आला आहे की या सापाला गोळी मारण्यात आली होती. परंतु, या दाव्याची खात्री करणारे सबळ पुरावे अजून उपलब्ध झालेले नाहीत. एना जुलियाच्या शोधकार्यात मदत करणारे डट शोधकर्त्याने जोर देऊन सांगितले की सापाचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती घेतली जात आहे.
प्रोफेसर फ्रीक वोंक यांना याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या सापावर गोळीबार करण्यात आल्याचे ऐकू येत आहे. परंतु, या शक्यतेची खात्री करणारे पुरावे अजून तपासी अधिकाऱ्यांना मिळालेले नाहीत. मृत्यूच्या कारणांचा तपास केला जात आहे. मृत्यूच्या सगळ्या शक्यतांचा विचार केला जात आहे. त्यामुळे कदाचित सापाचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळेही झालेला असू शकतो असे वोंक म्हणाले.
शोधमोहिमेच्या वेळी क्वीन्सलँड विद्यापीठाचे प्राध्यापक ब्रायन फ्राय यांनी सांगितले की या महाकाय मादी अॅनाकोंडा आमच्या दृष्टीस पडला. या सापाची लांबी 6.3 मीटर इतकी होती. एका अन्य अहवालात असे म्हटले आहे की या सापाची लांबी 7.5 मीटरपेक्षा जास्त होती आणि वजन जवळपास 500 किलो होते.