Download App

चार्टर्ड प्लेन अन् दिमतीला खास नेते, उत्तम जानकरांच्या मनधरणीसाठी दिल्लीपर्यंत खास नियोजन

  • Written By: Last Updated:

मुंबई : धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे माढ्यात भाजपची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माढ्यातील डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) धावाधाव सुरू झाली असून, भाजपचे माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांसाठी (Uttam Jankar) भाजप आणि फडणवीसांनी खास नियोजन केले आहे. जानकरांना फडणवीसांनी खास चार्टर्ड प्लेन पाठवून भेटीसाठी बोलावले असून, जानकरांसाठी दिल्लीपर्यंतचे खास नियोजन करण्यात आले आहे. जानकरांना घेऊन रणजीतसिंह नाईक निंबाळकर, शहाजीबापू पाटील आणि जयकुमार गोरे फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. फडणवीसांच्या भेटीनंतर जानकर यांना दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी नेले जाणार आहे. (BJP Special Planning For Uttam Jankar)

राऊतांबद्दल विचारताच फडणवीसांनी सांगितला स्वतःचा स्तर; काँग्रेसच्या जाहीरनाम्याचीही चिरफाड

जानकरांसाठी चार्टर्ड प्लेन

सोलापूर, माढ्यातील लोकप्रिय नेते उत्तमराव जानकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीसह भाजपची धाकधूक वाढली आहे. हा सगळा घोळ सोडवण्यासाठी फडणवीसांनी जानकरांना भेटीसाठी बोलावले असून, त्यांच्यासाठी खास चार्टर्ड प्लेनची सोय करण्यात आली आहे. जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा देऊ नये यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले असून, भाजपच्या या खास नियोजनानं उत्तम जानकरांची मनधरणी करण्यात फडणवीसांना यश येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

VBA Manifesto : लोकसभेसाठी आंबेडकरांच्या वंचितचा खास जाहीरनामा प्रसिद्ध; मतपरिवर्तन होणार?

फडणवीसांच्या चर्चेनंतर जानकर घेणार शाहंची भेट

दरम्यान, उत्तम जानकर यांचे मन वळवण्यासाठी आणि माढ्यात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी एकीकडे भाजपची धावाधाव सुरू झाल्याचे चित्र आहे. जानकर फडणवीसांच्या भेटीसाठी खास चार्टर्ड प्लेनने निघाले असून, या दोन्ही नेत्यांची भेट नागपूर की मुंबईत होते याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, फडणवीसांच्या भेटीनंतर जानकरांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला नेले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

follow us