Download App

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपये कामाचा भव्य शुभारंभ

Prajakt Tanpure : राहुरी नगर पाथर्डी मतदार संघात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामे करण्याच्या उद्देशाने

  • Written By: Last Updated:

Prajakt Tanpure : राहुरी नगर पाथर्डी मतदार संघात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामे करण्याच्या उद्देशाने माजी मंत्री  प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी स्थानिक विकास निधीतून सोनगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या दत्त मळा पर्वत मळा या रस्त्याला खडीकरण व मुरमीकरण साठी सुमारे 10 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.

या रस्त्याचा शुभारंभ काल सायंकाळी राहुरी नगरपालिकेच्या नगरध्यक्षा डॉ. उषाताई प्रसादराव तनपुरे यांच्या शुभहस्ते पार पडला. पर्वत मळा व दत्त मळा ग्रामस्थांच्या वतीने बेबीताई अंत्रे व मंदाताई पर्वत यांच्या हस्ते डॉ. उषाताई तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब अंत्रे सर हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण अंत्रे यांनी केले तर आभार प्रशांत अंत्रे यांनी मानले.

मिलिंद अनाप यांनी यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या परिसरसह मतदारसंघात गेल्या पाच वर्षाच्या केलेल्या कामांची माहिती दिली तसेच काही दिवसांपूर्वी या रस्त्याबाबत शाळकरी मुलांनी आमदार  प्राजक्त तनपुरे यांना भेटून निवेदन दिले होते तर आज या रस्त्याचा शुभारंभ पार पडत आहे असेही ते म्हणाले.

तर डॉ. उषाताई तनपुरे यांनी मार्गदर्शन करताना शुभारंभ होत असलेल्या रस्त्याला येत्या पंचवार्षिकमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊन हा रस्ता डांबरीकरण करून येऊ असे आश्र्वासन देखील उषाताई तनपुरे यांनी यावेळी दिले.

फक्त 13 दिवस अन् गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट, ‘हे’ आहे कारण

यावेळी माजी सरपंच अनिल अनाप,सूर्यभान शिंदे,किरण अंत्रे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र अनाप ,सुनील अंत्रे , अफजल तांबोळी , महेश पर्वत ,संतोष अंत्रे, अन्सार तांबोळी, पत्रकार अनिल अंत्रे, सूर्यभान अंत्रे, दानिश तांबोळी, दत्तात्रय अंत्रे, संजय शिंदे,सूरज शिंदे, नरेंद्र अनाप,सचिन शिंदे,सुभाष अनाप,सुमित पर्वत,चांगदेव पर्वत, पाराजी पर्वत, अनिल पर्वत ,रावसाहेब पर्वत, सुमित पर्वत,हरिभाऊ अंत्रे, अमोल दिघे,जितेंद्र दिघे , शिवाजी अनाप किशोर अनाप केशव अंत्रे सागर डुकरे, भारती अंत्रे, शिवानी पर्वत ,सुरेखा अंत्रे, यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us