आमदार तनपुरेंच्या संकल्पनेतून राहुरीत आदिशक्तीचा जागर सोहळ्याचे आयोजन

  • Written By: Published:
आमदार तनपुरेंच्या संकल्पनेतून राहुरीत आदिशक्तीचा जागर सोहळ्याचे आयोजन

अहमदनगर : राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे> (Prajakt Tanpure) यांच्या संकल्पनेतून तुळजाभवानी मातेच्या पालखीचे माहेरघर असलेल्या राहुरी शहरात आदिशक्तीचा जागर (Navratri Festival) या सोहळ्याचे आयोजन शनिवारी (5 ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता डॉ. नेहे हॉस्पिटल शेजारील मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार प्राजक्तदादा तनपुरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईच्या इंडियाज गॉट टॅलेंट ग्रुपचे एक्स वन एक्स डान्स ग्रुप हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .

नवरात्रोत्सवनिमित्ताने शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता राहुरीतील स्टेशन रोडवरील डॉ. नेहे हॉस्पिटल जवळील मैदानावर आदिशक्तीचा जागर हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या महिलांना नवरात्र उत्सव निमित्त फराळाची मेजवानी दिली जाणार आहे.

माजी नगराध्यक्षा डॉ.सौ.उषा तनपुरे ,ओजस्विनी पतसंस्थेच्या संस्थापिका सुजाता तनपुरे ,सोनाली तनपुरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष शारदा खुळे, शहराध्यक्ष अपर्णा ढमाळ, सायली तनपुरे यांनी या सोहळ्याला राहुरी शहरासह तालुक्यातील महिला भगिनींनी उपस्थित राहावे , असे आवाहन आमदार प्राजक्तदादा तनपुरे मित्र मंडळ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube