Download App

नाशिक-कोकणला अच्छे दिन! पर्यटनाच्या समृध्दीसाठी केंद्राकडून मिळाला भरमसाठ निधी…

Ex INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम रीफ आणि सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने 46.91 कोटींचा निधी दिला.

  • Written By: Last Updated:

Modi Government gives 150 crore : विधानसभा निवडणुकीच हाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) पानीपत झाल्यानंतर आता राज्यात महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं. भाजपला (BJP) सर्वाधिक जागा मिळाल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सीएमपदावरील दावा सोडल्यानं मुख्यमंत्रीपद भाजपलाच मिळणार हे निश्चित झालं. त्यानंतर आता लगेच केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी मोठा निर्णय घेतला.

प्रसूतीसाठी गर्भवती महिलेला 6 महिन्यांचा जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 

केंद्र सरकारने कोकण आणि नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. याबाबत माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर माहिती दिली. Ex INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम रीफ आणि सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने 46.91 कोटींचा निधी दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तर नाशिकमधील राम काल पथकाचा विकास करण्यासाठी 99.14 कोटींच्या निधीची तरतूद केंद्र सरकारने केल्याचही फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर चमकण्यासाठी चालना मिळत आहे.

मोठी बातमी : चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय 

पुढं फडणवीस म्हणाले की, Ex INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम रीफ आणि सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन आणि नाशिकमधील राम काल पथ हे प्रकल्प ₹3295.76 कोटी रुपयांचे आहेत. ते SASCI योजनेचा एक भाग आहेत. पर्यटनाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून झालेल्या आर्थिक मदतीमुळे राज्यातील पर्यटनाला जागतिक दर्जापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले.

 

follow us