मोठी बातमी : चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय

  • Written By: Published:
मोठी बातमी : चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय

Champions Trophy: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे (Champions Trophy) आयोजन करण्यात आले आहे. पण पाकिस्तानमधील सुरक्षेच्या कारणावरून भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसीला कळविले होते. या स्पर्धेसंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेची (आयसीसी) आज महत्त्वाची बैठक होती. त्याचपूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (The Ministry of External Affairs) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआयने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दहशतवाद आणि खेळ हा एकत्र होऊच शकत नाही, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पाकिस्तानचे कान टोचले आहे.

Champions Trophy : भारताने नकार देताच पाकिस्तानचा नवा फॉर्म्यूला; BCCI मंजूर करणार?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये जाण्याबाबत बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न आहे. सुरक्षेची चिंता आहे आणि म्हणून संघ पाकमध्ये खेळण्यासाठी जाणार नाही, असे जैस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे भूमिका येण्यापूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतील होती. भारतीय संघ पाकिस्तानला का जाऊ शकत नाही. भारताने पाकिस्तान का जाऊ नये? आक्षेप काय आहे? जर पंतप्रधान तिथे बिर्याणी खायला जाऊ शकतात, तर भारतीय संघ त्या देशात गेला तर ते चांगले नाही का ? असे अकलेचे तारे तेजस्वी यादव यांनी तोडले होते.

पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार का? ‘या’ दिवशी होणार मोठा निर्णय

बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर उत्तर
बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबाबत आम्ही विरोध अगदी स्पष्ट केला आहे. आम्ही हा मुद्दा बांगलादेशासमोर मांडला आहे की त्यांनी अल्पसंख्याकांचे रक्षण करणे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांची सुरक्षा आणि सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. चिन्मय कृष्णा दासच्या अटकेबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना जैस्वाल म्हणाले, आम्ही इस्कॉनकडे सामाजिक सेवेची जागतिक स्तरावर प्रतिष्ठित संस्था म्हणून पाहतो. चिन्मय दास यांच्या अटकेबाबत आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे. याबाबत खटले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. आम्ही आशा करतो आणि अपेक्षा करतो की या प्रक्रिया निष्पक्ष, न्याय्य आणि पारदर्शक रीतीने हाताळल्या जातील आणि या व्यक्तींचा आणि संबंधित सर्वांचा पूर्ण आदर सुनिश्चित केला जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube