16 people, including newly elected corporators, burn : नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही पक्ष राज्यात मोठे पक्ष म्हणून समोर आले. पुणे(Pune) जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा करिष्मा पाहायला मिळाला. जागोजागी विजयाचा जल्लोष करण्यात आला. मात्र या विजयाच्या जल्लोषाला पुरंदरमधील जेजुरी(Jejuri) गडाच्या कमानीजवळ गालबोट लागल्याची बातमी समोर येत आहे. जेजुरी गडाच्या कमानीजवळच विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू असताना अचानक आगीचा भडका उडाला आणि एकचं गोंधळ उडाला.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक जेजुरी गडावर दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. अनेक अति उत्साही कार्यकर्त्यांनी जेजुरी गडाच्या पायऱ्या जिथून सुरू होतात तिथे असणाऱ्या कमानीवर चढून नगरसेवकांवर भंडारा उधळण्यास सुरूवात केली. येथे कोणतीही निवडणूक झाली तरी बऱ्याचदा या कमानीवर चढून विजयी उमेदवारांवर भंडारा उधळला जातो.
राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी रस्सीखेच, शेळके म्हणाले, मी जबाबदारी घ्यायला तयार…
भंडाऱ्याची उधळण सुरू असतानाच नगरसेवकांसोबत आलेल्या महिला विजयी नगरसेवकांचं औक्षण करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन पुढे आल्या. उधळलेला भंडारा आरतीच्या ताटातील ज्योतीवर पडून आगीचा मोठा भडका उडाला. नवनिर्वाचित नगरसेवकांचं औक्षण सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने एकचं गोंधळ उडाला आणि आगीच्या भडक्यात तब्बल 16 ते 17 जण भाजले आहेत. मात्र सुदैवानं या अपघातात कोणालाही गंभीर इजा झालेली नाही.
दरम्यान भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे ही आग लागली असल्याची चर्चा आहे. भेसळयुक्त भंडाऱ्यामध्ये हळदीपेक्षा केमिकल्स जास्त प्रमाणात वापरल्या गेल्यामुळे हा भंडारा आगीच्या संपर्कात आल्यास पेट घेण्याची शक्यता असते. असाच काहीसा प्रकार काल घडल्याचं पाहायला मिळालंय. नेमकं त्या वेळेस जमलेल्या प्रत्येकाच्या अंगावर पहिलेच गुलाल पडलेला होता, आणि वरून उधळण्यात आलेल्या गुलालाने पेट घेतल्याने ती आगीची दाह त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ते भाजले गेले आहेत.
