कोण मारणार बाजी? आज 288 नगरपरिषद- नगरपंचायतीचा निकाल; 10 वाजता मतमोजणीला सुरुवात

Nagarparishad Election Result 2026 : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार

Nagarparishad Election Result 2026

Nagarparishad Election Result 2026

Nagarparishad Election Result 2026 : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 288 पैकी 264 नगरपरिषदेसाठी आणि नगरपंचायतीसाठी राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती तर 20 डिसेंबर रोजी 24 नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यंदा मुख्य लढत महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. काही ठिकाणी भाजपविरुद्ध शिंदे शिवसेना तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. त्यामुळे या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष कोणता ठरणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे आज 10 वाजल्यापासून मतमोजणीला (Nagarparishad Election Result 2026) सुरुवात होणार असून दुपारपर्यंत सर्वा नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी संपूर्ण तयारी केली असून मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी केंद्रावर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आतमध्ये घेऊन जाता येणार नाही. तसेच आयोगाने ठरवलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.

तुकाराम मुंढेंची तंबी : ‘दिशा अभ्यासक्रमा’ची सक्ती, अन्यथा शाळांचे अनुदान बंद !

राज्य निवडणूक आयोगाकडून 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सुरुवातीला राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान 2 डिसेंबर रोजी आणि निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी निवडणूका पुढे ढकलत 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता. तर 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.

Exit mobile version