32 बवावट खाते अन् कोट्यवधींचे डाव, अशोक खरात प्रकरणात पतसंस्थेचा मॅनेजर अटकेत

Ashok Kharat :  नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ

Ashok Kharat

Ashok Kharat

Ashok Kharat :  नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अशोक खरातला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी एकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी जगदंबा पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर (Avinash Kandekar) याला अटक केली आहे. अशोक खरातने केलेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणात सिन्नरमधील (Sinnar) जगदंबा पतसंस्थेची (Jagdamba Credit Society) भूमिका असल्याच्या संशयावरून पोलिसांनी या पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने (Ashok Kharat) बेकायदेशीर कमावलेला पैसा कायदेशीर भासवण्यासाठी बँकिंग यंत्रणेचा गैरवापर केल्याचा संशय पोलिसांना होता. या प्रकरणात तपास करत असताना सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेत खरातशी संबंधित तब्बल 32 संशयास्पद खाती आढळली. ही खाती बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आली असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा एसआयटीकडून (SIT) करण्यात आला आहे.

तसेच या आर्थिक व्यवहारात मॅनेजर अविनाश कांडेकर याची भूमिका संशयास्पद आढळल्याने सिन्नर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 32 संशयास्पद खाती उघडण्यात अविनाश कांडेकरने मदत केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.

प्रकाशक प्रकाश आंबींना सुरक्षा देण्यात यावी, विजय वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र-

पोलिसांनी महिलांच्या लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणुकीचा गुन्हा भोंदूबाबा अशोक खरातविरोधात दाखल केला असून या प्रकरणात अशोक खरातच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version