Ladki Bahin Scheme : विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी (Mahaytuti) गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Scheme) योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली. राज्यातील जवळपास ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती स्वत: राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजना जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जात होते. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, विरोधकांकडून या योजनेवर टीका सुरू झाली. यामागे कारणही आहे. योजनेसाठी अर्ज करताना सरकारी यंत्रणांनी निकषांकडे लक्ष न देता सरसकट अर्ज मंजूर केले होते.
दरम्यान, या योजनेच्या पात्रतेसाठी निकषांची चाळणी लावण्यात आली आहे. आदिती तटकरेंनी याची माहिती दिली. अपात्रतेच्या निकषांनुसार, संजय गांधी निराधार योजनेच्या २,३०,००० महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आलेय. याशिवाय, ६५ वर्षांवरील १,१०,००० महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याचं तटकरे म्हणाल्या.
धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ घेतला गळफास
आदिती तटकरे यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 7, 2025
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकुण अपात्र महिला – ५,००,०००
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे, असंही तटकरे यांनी म्हटलं.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान महायुतीने राज्यात आपलं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या लाभाची रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये केली जाईल, अशी घोषणा केली होती. आता लाडक्या बहिणींना या घोषणेच्या अंमलबजावणीची प्रतिक्षा आहे. दरम्यान, राज्य सरकारचं आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.