धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ घेतला गळफास

धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ घेतला गळफास

Pune PSI Anna Gunjal End Life In Lonawala : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव अण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal End Life) असे आहे. लोणावळ्यात (Lonawala) त्यांनी स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे पोलीस दलात (Pune Police) मोठी खळबळ उडाली आहे. सोबतच अधिकाऱ्यांना देखील मोठा धक्का बसलाय.

पीएसआय अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ आत्महत्या (Pune News) केलीय. ते खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यकरत होते. मात्र मागील तीन दिवसांपासून अण्णा गुंजाळ हे कर्तव्यावर नव्हते. शिवाय त्यांच्यासोबत काही संपर्क देखील होत नव्हता. त्यानंतर थेट आज त्यांचा शोध लागला. त्यावेळी त्यांनी गळफास घेवून जीवन संपवल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसलाय. अण्णा गुंजाळ मावळातील लोणावळा येथे पुणे पोलीस आयुक्तल्यातील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.

काँग्रेसचा पराभव दिसतोय, शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार; परांजपेंचा रोख नेमका कोणाकडे?

पोलिसांना 112 या क्रमांकावर एक फोन आला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे गेल्यावर त्यांना पीएसआय अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर तिथे लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. शिवदुर्ग मित्र रेस्कू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने पोलिसांनी अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह खाली उतरवला, अशी माहिती मिळतेय.

अण्णा गुंजाळ यांनी गळफास घेतल्याचं समोर आल्यानंतर पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली. लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर गुंजाळ यांची गाडी देखील आढळून आलीय. या गाडीमध्ये एक डायरी असल्याचं सांगितलं जातंय. या डायरीमध्ये कदाचित आत्महत्येचं कारण सुद्धा दडलेलं असू शकतं, असा अंदाज वर्तवला जातोय. घटनास्थळी लोणावळा ग्रामीण पोलीस पोहोचलेत. खडकी पोलीस देखील घटनास्थळाकडे रवाना झालेत.

राजकारणातील पोरकटपणा…फक्त कॅसेट वाजवणं सुरू, प्रवीण दरेकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

पोलिसांनी पीएसआय अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय. टायगर पॉईंटजवळ असलेली गाडी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलीय. कारमध्ये सापडलेल्या डायरीत अण्णा गुंजाळ यांनी काही लिहून ठेवलंय का, याचा तपास पोलीस करत आहेत. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ त्यांनी गळफास घेतलाय. पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांत देखील चिंतेचं वातावरण आहे. पोलीस उपनिरीक्षकाचा फोन तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होता. अखेर लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर धक्कादायक प्रकार उघड झालाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube