Download App

वारकऱ्यांसाठी गुड न्यूज! आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार 5 हजार बस

5 thousand special buses will run for Pandharpur on the occasion of Ashadhi Vari : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूर वारीला जाणाऱ्या राज्यभरातील भाविकांना राज्य सरकारने (State Govt) एक आनंदाची बातमी दिली आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज एसटी महामंडळाला (ST Corporation) दिले. या विशेष गाड्या 25 जून ते 05 जुलै या कालावधीत धावणार असून माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (27 जून) रोजी 200 जादा बसेस देण्यात आल्या आहेत.

पंढरपूर-आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या एसटी प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सुविधा द्या. यात्रेकरू-प्रवाशांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत नेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी एसटीची असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

6 जिल्ह्यांतून गाड्यांची योजना
आषाढी यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा जिल्ह्यांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी एसटीने सुमारे 5000 गाड्या रवाना करण्याचे नियोजन केले आहे. औरंगाबाद विभागातून 1200, मुंबईतून 500, नागपूरमधून 100, पुण्यातून 1200, नाशिकमधून 1000 आणि अमरावतीमधून 700 विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Pune Politics: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची ‘शाळा’

चार तात्पुरते बसस्थानके बनवण्यात येणार
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविकांसाठी विविध विभागातून बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेकरू, भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे एका स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक ही चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ स्वच्छतागृहे, संगणकीकृत आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शक फलक अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Tags

follow us