Pune Politics: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची ‘शाळा’

Pune Politics: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची ‘शाळा’

Devendra Fadnavis : अगोदर कसबा विधानसभा (Kasbah Assembly) पोटनिवडणुकीमध्ये हक्काची असणारी जागा आता भाजपने (BJP) गमावली आहे. यानंतर कर्नाटक विधानसभा (Karnataka Legislative Assembly) निवडणुकीमध्ये देखील भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे आता भाजप राज्यामध्ये ऍक्शन मोडवर आली आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात महत्वाची बैठक घेतली आहे.

या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आदी उपस्थित होते. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर पुण्यात भाजपामध्ये मोठी खांदेपालट होणार असल्याचे सांगितले जात आहे. यानुसार आज देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, पदाधिकारी यांची सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील का? फडणवीसांनी दिले थेट उत्तर

देवेंद्र फडणवीस हे आज पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे पदाधिकारी, आमदारांची एक महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये फडणवीस यांनी सगळ्यांच्या कामाचा लेखाजोखा घेतले आहे. तर पुढील आठ दिवसामध्ये प्रदेश आणि शहरामध्ये भाजपात मोठे बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुण्यात 18 तारखेला भाजपच्या कार्यकरणीची बैठक होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

नाशिक ACB धडक कारवाई : 30 लाखांची लाच घेणाऱ्या सहकार उपनिबंधक आणि वकील जाळ्यात

या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील हजेरी लोणार असलायची माहिती मिळाली आहे. त्याकरिता देखील ही बैठक महत्वाची ठरली आहे. तर दुसरीकडे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणुका लागू शकतात, अशी शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे. यामुळे भाजपने या बैठकीपासून निवडणुकीच्या तयारीला सुरवात केल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube