नाशिक ACB धडक कारवाई : 30 लाखांची लाच घेणाऱ्या सहकार उपनिबंधक आणि वकील जाळ्यात

  • Written By: Published:
नाशिक ACB धडक कारवाई : 30 लाखांची लाच घेणाऱ्या सहकार उपनिबंधक आणि वकील जाळ्यात

ACB Trap Nashik : नाशिक सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक व वकील यांना 30 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. केली आहे. जिल्हा उपनिबंधक सतिश भाऊराव खरे व वकील शैलेश सुमातीलाल सुभद्रा अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी खरे यांच्या घरामध्ये ही कारवाई झाली आहे.

NIA Raid : धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्या 16 जणांना अटक, धक्कादायक माहिती समोर

याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक तक्रार आली होती. तक्रारदार हे नाशिक जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आले होते. त्यांच्या निवडीविरुद्ध तक्रार झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी सतिश खरे यांनी तीस लाखांचे लाच मागितली होती. वकील शैलेश सुभद्रा यांनी तक्रारदार यांना लाचेची 30 लाख रुपये रक्कम खरे यांच्या घरी घेऊन येण्यास सांगितले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील का? फडणवीसांनी दिले थेट उत्तर

दरम्यान तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली होती. अॅड. शैलेश सुभद्रा यांनी लाचेची 30 लाख रुपयांची रक्कम खरे यांच्या घरी स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 30 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुकदेव मुरकुटे, पोलीस अंमलदार मनोज पाटील, अजय यांच्या पथकाने केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube