NIA Raid : धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्या 16 जणांना अटक, धक्कादायक माहिती समोर
NIA Raid : देशात धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्यांवर एनआयएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. देशातल्या तीन राज्यांतून एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होणार? देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य
एनआयएने मध्यप्रदेशातील भोपाळ, छिंदवाडा, आणि हैद्राबादमधून अटक करण्यात आली असून अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. अटक करण्यात आलेले 16 जण हिज्ब-उत-तहरीर या संघटनेशी संबंधित असल्याच उघड झालंय.
भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, लंडनहून परतताच राहुल नार्वेकरांचं मोठं विधान
एनआयएने तेलंगणाच्या एटीएसने ही कारवाई केली असून या पथकाकडून कारवाई करीत असताना स्थानिक पोलिसांनाही याबाबत माहिती नव्हती. आत्तापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये भोपाळमधून १०, हैदराबादमधून ५ तर छिंदवाडा इथून एका जणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. अटकेनंतर धार्मिक कट्टरता पसरवणारं हे मोड्युलच उद्ध्वस्त करण्यात आलं आहे.
Madhuri Dixit : बाबो! माधुरी 250 करोडची मालकीण अन् महिन्याला कमावते…
यासंदर्भात मध्यप्रदेश एटीएसकडून चौकशी सुरु होती. पण हे प्रकरण आंतरराज्यीय असून याचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत. त्यामुळं आता याचा तपास एनआयएनं ताब्यात घेतला आहे.
अटकेत असलेल्या लोकांचा पाकिस्तानातील एका फोन नंबरच्या सतत संपर्कात असल्याचंही प्राथमिक तपासात समोर आलं आहे. एनआयएनं या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.