Rahul Gandhi On Farmers : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यावरुन विरोधक राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Government) टीका केली आहे. गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे मात्र सरकार गप्प आहे फक्त बघत आहे. अशी टीका लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर केली आहे.
राहुल गांधी यांनी याबाबत एक्स वर पोस्ट करत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विचार करा फक्त 3 महिन्यांत महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हा फक्त एक आकडा नाही तर 767 घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि 767 ही कुटुंब आता कधीही सावरु शकत नाही मात्र सरकार गप्प आहे फक्त पाहत आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी सरकारवर केली आहे.
सोचिए.. सिर्फ 3 महीनों में महाराष्ट्र में 767 किसानों ने आत्महत्या कर ली।
क्या ये सिर्फ एक आंकड़ा है? नहीं। ये 767 उजड़े हुए घर हैं। 767 परिवार जो कभी नहीं संभल पाएंगे।
और सरकार? चुप है। बेरुख़ी से देख रही है।
किसान हर दिन कर्ज़ में और गहराई तक डूब रहा है – बीज महंगे हैं, खाद… pic.twitter.com/uDzFpYoMrG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2025
राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत, बियाणे महाग होत आहेत, खते महाग झाली आहे, डिझेल महाग आहे पण किमान आधारभूत किमतीची हमी (MSP) नाही. शेतकरी जेव्हा कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्षित करण्यात येत आहे. पण ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहे. त्यांचे कर्ज मात्र मोदी सरकार आरामात माफ करत आहे. आजची बातमी बघा अनिल अंबानींचा 48 हजार कोटींचा एसबीआय घोटाळा. असं देखील राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Diogo Jota : दिग्गज फुटबॉल खेळाडूचा कार अपघातात मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मोदी जी म्हणाले होते की, ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतील मात्र आज अशी परिस्थिती आहे की, अन्नादात्याचे आयुष्य अर्ध होत आहे. सरकारची ही व्यवस्था शेतकऱ्यांना मारत आहे पण मोदीजी आपल्या पीआरचा तमाशा पाहत आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.