मुंबई : दहशतवाद्यांशी व्यवहार आणि मनी लॉंड्रिंग केल्याच्या आरोपांमध्ये तुरुंगात असलेल्या नबाम मलिक यांचा पाठिंबा शिंदे-फडणवीस सरकार घेणार का असा सवाल सध्या विचारला जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील अनेक समीकरण बदलली आहे. राष्ट्रवादीचे 53 पैकी 32 आमदार सध्या अजित पवार यांच्यासमवेत आहेत. तर 12 आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. या आमदारांशिवाय 8 आमदार कुंपनार आहेत. याच 8 आमदारांमध्ये माजी मंत्री नवाब मलिक यांच्याही नावाचा समावेश आहे. (8 NCP MLA confuse between Ajit Pawar and Sharad Pawar)
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना नवाब मलिक यांच्याविरोधात रान उठवले होते. त्यांच्या लोखंडवाला कॉम्पेक्स येथील जमिनीचा व्यवाहर दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांसोबत झाला असल्याचा आरोप करत त्यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर सत्तेल येताच शिंदे यांनीही मलिक यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती. दहशतवाद्यांशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, असं म्हणतं ठाकरेंवर टीका केली होती.
त्यानंतर आता अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देताच त्यांच्यासोबत 32 आमदारांनीही पवारांची साथ दिली आहे. तर अद्याप 12 आमदार पवारांसोबत आहेत. याशिवाय 8 आमदार कुंपनावर आहेत. हे आमदार अद्यापही संभ्रमात असून नेमकी कोणाची साथ द्यायची या विचारात आहेत. यातच मलिक यांच्या नावाचाही समावेश आहे. उद्या जर मलिक यांनीही शिंदे यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्यास शिंदे त्यांचा पाठिंबा स्वीकारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
1. छगन भुजबळ
2. दिलीप वळसे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. धनंजय मुंडे
5. आदिती तटकरे
6. संजय बनसोडे
7. अनिल पाटील
8. धर्मरावबाबा आत्राम
9. किरण लहमाटे
10. निलेश लंके
11. दौलत दरोडा
12. मकरंद पाटील
13. अतुल बेनके
14. सुनिल टिंगरे
15. इंद्रनील नाईक
16. अशोक पवार
17. अण्णा बनसोडे
18. सरोज अहिरे
29. बबनदादा शिंदे
20. यशवंत माने
21. नरहरी झिरवळ
22. दत्ता भरणे
23. शेखर निकम
24. दीपक चव्हाण
25. राजेंद्र कारेमोरे
26. नितीन पवार
27. मनोहर चंद्रिकापुरे
28. संग्राम जगताप
29. राजेश पाटील
30. सुनील शेळके
31. दिलीप मोहिते
32. बाबासाहेब पाटील
1. रामराजे निंबाळकर
2. अमोल मिटकरी
3. शशिकांत शिंदे
4.
5.
6.
1. सुनिल तटकरे
2. अमोल कोल्हे
3. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)
1. जयंत पाटील
2. जितेंद्र आव्हाड
3. रोहित पवार
4. राजेश टोपे
5. प्राजक्त तनपुरे
6. अनिल देशमुख
7. सुनिल भुसारा
8. सुमनताई पाटील
09.संदीप क्षीरसागर
10. बाळासाहेब पाटील
11. चेतन तुपे
12. मानसिंगराव नाईक
1. सुप्रिया सुळे
2. श्रीनिवास पाटील
3. वंदना चव्हाण (राज्यसभा)
4. फौजिया खान (राज्यसभा)
1. अरुण अण्णा लाड
2.
3.
1. नवाब मलिक
2. प्रकाश सोळंखे
3. बाळासाहेब आजबे
4. आशुतोष काळे
5. दिलीप बनकर
6. माणिकराव कोकाटे
7. चंद्रकांत नवघरे
8. राजेंद्र शिंगणे (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)