ठाणे : येथील शहापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 30 वर्षीय महिलेने आपल्या 4 साथीदारांसह प्रियकराला बेदम मारहाण करून आणि लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर प्रियकराला शहापूर महामार्गावर नग्नावस्थेत फेकून चौघांनीही पोबारा केला होता. बालाजी शिवभगत असं पीडित प्रियकराचं नाव असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविका भोईर आणि नदीम खान अशी पाच आरोपींपैकी दोघांची नावे आहेत. (A 30-year-old woman, along with four others, allegedly looted her boyfriend of lakhs of rupees)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित बालाजी शिवभगत हा शहापूर येथील रहिवासी असून त्याचा बांधाकाम व्यावसाय आहे. त्याचे हापूर येथील रहिवासी असलेल्या भाविका भोईर यांच्याशी गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 28 जून रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास भाविकाने शिवभगत यांना शहापूर येथील आटगाव महामार्गावरील एका ठिकाणी बोलावले.
याठिकाणी हे जोडपे बोलत असताना भोईरचे चार साथीदार आले आणि अचानक गाडीत बसले. आरोपींनी शिवभगत यांना एका बंद अनोळखी रेस्टॉरंटमध्ये नेले आणि सकाळपर्यंत बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी शिवभगत यांचे कपडे काढून त्यांचा व्हिडिओ क्लिक केला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील दोन सोन्याच्या साखळ्या, सात बोटांतील अंगठ्या काढून घेतल्या. तसंच पहाटे त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, शहापूर महामार्गावर त्यांना नग्नावस्थेत सोडून पाचच्या सुमारास पळ काढला.
दरम्यान, शिवभगत, दोन दिवस रुग्णालयात दाखल होते आणि अजूनही या आघातातून बरे झालेले नाहीत. ते म्हणाले, “मी तिच्यासाठी सर्व काही केले, तिच्या इच्छेनुसार एक छोटेसे घर बांधलं, तिच्यासाठी कायम काहीतरी खरेदी करत होतो.तिची इच्छा माझी आज्ञा होती. तिने दुसर्या माणसासाठी माझा विश्वासघात केला आणि माझ्यावर क्रूरपणे हल्ला केला. यावेळी भेटायला जातानाही मी साडी, सोन्याचे झुमके, सोन्याचे बांगड्या, पैंजण, नवीन पावसाळी शूज आणि छत्री होती.
“जेव्हा मी या सर्व भेटवस्तू घेऊन घटनास्थळी पोहोचलो तेव्हा ती आटगाव हायवेवर माझ्या क्रेटा कारमध्ये बसली आणि सर्व भेटवस्तू घेतल्या. पण त्याचवेळी अचानक चार जण, त्यापैकी तीन अज्ञात, कारमध्ये घुसले. त्यांनी मला बाजूला ढकलले आणि माझ्या डोक्यावर चॉपरने हल्ला केला. त्यापैकी एकाने गाडी चालवायला सुरुवात केली,” असेही शिवभगत म्हणाले.
सर्व घटनाक्रमानंतर पीडित शिवभगत यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि मदतीसाठी मित्रांना बोलावले. मित्रांनीच त्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, शहापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व 5 आरोपींवर आयपीसी कलम 365, 506 आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.