दादांसोबत की साहेबांसोबत? आमदार किरण लहामटेंनी निर्णय ठेवला राखून…

दादांसोबत की साहेबांसोबत? आमदार किरण लहामटेंनी निर्णय ठेवला राखून…

Mla Kiran Lahamate : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता आमदार किरण लहामटे हे शरद पवारांसोबत जाणार की अजित पवारांसोबत? याची उत्सुकता लागलेली असतानाच आमदार किरण लहामटेंनी हा निर्णय जनता दरबारात ठेवला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवारांच्या गोटात तर काही नेते शरद पवारांसोबत असल्याचं दिसतंय. त्यावर किरण लहामटेंनी आपण जनतेसमोर हा निर्णय ठेवल्याची भूमिका मांडलीयं. (With Dada or Saheb? MLA Kiran Lahamte decided to keep)

अजित पवारांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल, पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगात जाण्याचे संकेत

देवगिरीवर झालेल्या बैठकीनंतर राजभवनामध्ये अजित पवारांसोबत किरण लहामटेही उपस्थित होते. लहामटे यावेळी आमदारांच्या पहिल्याचं लाईनमध्ये बसल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. त्यावर लहामटेंनी थेट भाष्य करीत उत्तर दिलं आहे. आपण जनतेसाठी जे काम करीत आहे त्याची लाज बाळगण्याचं काही एक कारण नसल्याचं ते म्हणाले आहेत.

NCP Political Crisis Live : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली, पटेल, तटकरेंना मंत्रिपद ?

तसेच सुरुवातील मला वाटलं की, ही शरद पवारांची गुगली असेल त्यामुळेच आम्ही शपथविधीला थांबलो होतो. पण सर्व महाराष्ट्राला अजितदादांची कार्यपद्धती माहितीये, शरद पवारांचीही काम करण्याची पद्धत सर्वांना भावते, आता लोकं जे निर्णय देतील त्यानूसार मी काम करणार असल्याचं लहामटेंनी स्पष्ट केलं आहे.

मला मोठं करणारं ते लोकं आहेत, जनता जनार्दन समोर ठेऊनच निर्णय घेणार, सध्या मी जनतेसमोर असून लोकं काय सांगतील त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं किरम लहामटे म्हणाले आहेत. तसेच मला जनतेसाठी राजकारण करायचं आहे, त्यामुळे मी जो काही निर्णय घेईल, त्यानंतर काय होईल त्याची परवा नसल्याचा इशाराही दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube