Download App

सर्वसामान्यांना मोठा झटका; वीज दरात मोठी वाढ

मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या (New fiscal year) सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (Maharashtra Electricity Regulatory Commission)वीज दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे साहजिकच दर महिण्याला सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 1 एप्रिल 2023 पासून हे नवीन दर जाहीर केले आहेत. राज्याला वीजपुरवठा (power supply)करणाऱ्या महावितरण कंपीनीच्या वीजदरात सरासरी सात ते आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महावितरणबरोबरच अदाणी(Adani), टाटा (Tata)आणि बेस्टच्या (Best) वीज दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी अशा सर्वच संवर्गातील ग्राहकांना विजेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी अशा सर्वच संवर्गातील ग्राहकांना विजेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. राज्यात मार्च 2020 च्या अखेरीस विजेचे दर वाढवण्यात आले होते. वीज कायद्यानुसार 5 वर्षात वीज दरात सुधारणा केली जाते.

धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर फरार

महावितरणच्या दरवाढ याचिकेवर शनिवारी सायंकाळी निर्णय झाला आहे. त्यात दोन वर्षात तब्बल 21 टक्के दरवाढीस कंपनीला मुभा दिली आहे. आयोगाच्या निर्णयानुसार कंपनीला आगामी दोन वर्षात अतिरिक्त महसूल 39, 567 कोटी रुपये मिळणार आहेत. 2023-24 मध्ये 7.25 टक्के तर दुसऱ्या वर्षी 14.75 टक्के दरवाढ होईल. त्याचा अर्थ मंजूर केलेली दोन वर्षातील एकूण दरवाढ 22 टक्के आहे.

महावितरणचा 101 ते 300 युनिट विजेचा दर 10 रुपये 81 पैसे, तर अन्य खासगी कंपन्यांचा वीज दर हा सात ते पावणेआठ रुपये आहे. म्हणजेच महावितरणची वीज त्या तुलनेत महाग असणार आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदाणी वीज कंपनीचे 2023-24 आणि 2024-25 चे घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, कृषी आदी विविध ग्राहकांचे वीजदर जाहीर केले आहेत.चारही वीज कंपन्यांच्या स्थिर आकार आणि वीज दरात वाढ झाली आहे. सरासरी वीज पुरवठ्याचा दर साडेनऊ रुपये प्रतियुनिट अधिक झाला आहे.

चारही वीज कंपन्यांच्या स्थिर आकार आणि वीज दरात वाढ झाली असून, सरासरी वीज पुरवठय़ाचा दर साडेनऊ रुपये प्रति युनिटहून अधिक झाला आहे. आयात कोळशाच्या दरात झालेली मोठी वाढ, करोनाकाळात उत्पन्नात झालेली घट, पारेषण खर्चात झालेली वाढ आणि अन्य कारणांमुळे वीज कंपन्यांचा खर्च वाढल्याने ही दरवाढ मंजूर करण्यात आली आहे.

Tags

follow us