धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर फरार

धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर फरार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal)शनिवारी वर्धमानमध्ये (Vardhaman)भाजप नेते राजू झा (BJP leader Raju Jha shot dead in West Bengal)यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. येथील शक्तीगड परिसरात ही घटना घडली. हल्लेखोराने गोळी झाडून तेथून पळ काढला. त्याचबरोबर पोलिसांनी (Police)या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, राजू झा असे मृत व्यक्तीचं नाव आहे. ते दुर्गापूर येथील व्यापारी आहेत. ते आपल्या काही सहकाऱ्यांसोबत कोलकात्याला निघाले होते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा; संपूर्ण राज्याचं लक्ष

दरम्यान, शक्तीगढ परिसरातील एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांना गोळी लागली. मिठाईच्या दुकानाबाहेर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती देताना वर्धमानचे एसपी कमनासिस सेन यांनी सांगितले की, कारमध्ये राजू झा यांच्यासह तीन जण प्रवास करत होते. आरोपीचा हेतू समजू शकला नाही. पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी सांगितलं की, गोळी लागल्यानंतर भाजप नेते राजू झा यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याचवेळी जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजू झा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पोलिसांनी सांगितले की, झा यांच्यावर डाव्या आघाडीच्या राजवटीत सिलपंचालमध्ये अवैध कोळशाचा व्यवसाय चालवल्याचा आरोप आहे. तृणमूल सरकारमध्येही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube