पत्र्याच्या घरातून खाकी वर्दीपर्यंत… जालन्यातील सालगड्याचा मुलगा UPSC मध्ये चमकला

भोकरदन येथील 26 वर्षीय भिकन रोजेकर याने UPSC परीक्षेत 812 वा क्रमांक मिळवत अत्यंत कठीण परिस्थितीतून ये यश संपादन केले आहे.

Untitled Design 153

Untitled Design 153

A boy from Salgad in Jalna shines in UPSC : देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मनाली जाणारी UPSC परीक्षा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुणांच्या जिद्दीची साक्ष देऊन गेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत काही तरुणांनी आपल्या कष्टाच्या जोरावर यशाचा झेंडा रोवला आहे. अशाच जिद्दीची प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ या छोट्याशा गावातून. येथे एका मजुराच्या मुलाने UPSC परीक्षेत उत्तीर्ण होत IPS पदापर्यंतचा प्रवास यशस्वी केला आहे.

साल गड्याच्या मुलाची जिद्द

भोकरदन येथील 26 वर्षीय भिकन रोजेकर याने UPSC परीक्षेत 812 वा क्रमांक मिळवत अत्यंत कठीण परिस्थितीतून ये यश संपादन केले आहे. रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टांचे फळ अखेर त्यांच्या मुलाच्या रूपाने फुलले आहे. भिकनच्या यशानंतर त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या सध्या घरात सध्या आनंदाचा उत्सव पाहायला मिळत आहे. गावकरी, नातेवाईक आणि मित्रमंडळी सतत भंबेरी देत आहेत. शाल, पुष्पगुच्छ आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याने त्या छोट्याशा घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षणाचा संघर्षमय प्रवास

भिकनचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. मात्र पुढील शिक्षणासाठी त्याने छत्रपती संभाजीनगर गाठले. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे शिक्षणाचा खर्च भागवणे कुटुंबासाठी मोठे आव्हान होते. तरी देखील आई-वडिलांनी कष्ट करत मुलाच्या शिक्षणाला कधीच खंड पडू दिला नाही. UPSC च्या तयारीसाठी भिकनला एका स्वयंसेवी संस्थेची मदतीने दिल्लीला राहण्याची आणि अभ्यास करण्याची संधी मिळाली. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. UPSC सारख्या कठीण परीक्षेत त्याला अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला. अनेक वेळा अपयश आल्यानंतर देखील त्याने हार मानली नाही. सातत्याने अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सहाव्या प्रयत्नात त्याने अखेर यश मिळवत IPS अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

पवना नदीचे पावित्र्य धोक्यात; जनावरांची चरबी-चामडे थेट नदीपात्रात फेकले

वडिलांचे कष्ट – मुलाच्या यशामागील आधार

भिकनचे वडील जगन रोजेकर हे दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून कुटुंब चालवतात. स्वतःच्या कठोर परिश्रमातून त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी लागणार खर्च भागवला. आर्थिक अडचणी असून देखील मुलाने मोठे व्हावे, अधिकारी बनावं हे स्वप्न त्यांनी जपलं आणि त्यासाठी आयुष्यभर कष्ट केले.

आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना

आपला लेक IPS अधिकारी झाला, ही बातमी मिळाल्यानंतर भिकनच्या आई-वडिलांचा आनंद शब्दात मावणारा नव्हता. वर्षानुवर्षे केलेल्या कष्टांना आता यशाची गोड चव मिळाली आहे. मुलगा अधिकारी झाला, आता त्याच्या खांद्यावर खाकी वर्दी दिसणार, या भावनेने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

यशाला गवसणी घातल्यानंतर दिली प्रतिक्रिया

माध्यमांशी बोलताना भिकन रोजेकर म्हणाला की, आई-वडिलांचे अपार कष्ट आणि त्यांची प्रेरणा हीच माझ्या यशाची खरी ताकद आहे. मित्र आणि नातेवाईकांनी देखील प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. अनेक वेळा अपयश आले, मात्र प्रयत्न थांबवले नाहीत. शेवटी सहाव्या प्रयत्नात हे स्वप्न पूर्ण झाले.

ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणा

भिकन रोजेकरची ही यशोगाथा केवळ एका कुटुंबाचा आनंद नाही, तर ग्रामीण भागातील हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. आर्थिक अडचणी, अपयश आणि संघर्ष असून देखील जिद्द कायम ठेवली तर यश नक्की मिळते, हे भिकन याने सिद्ध करून दाखवले आहे. आज कोळगाव सपकाळ या छोट्याशा गावात आनंदाचा जल्लोष सुरू आहे. एका मजुराच्या मुलाने IPS अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करत केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे.

Exit mobile version