Download App

मोठी बातमी! खून प्रकरणात शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल

बीडमधील परळीत मरळवाडी सरपंचाच्या खून प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीतेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Beed Parli Firing : बीड जिल्ह्यतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. परळीतील बँक कॉलनीत गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामध्ये मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला होता. (Beed) तर दोन जण गंभीर झाले होते. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Baban Gite) यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छातीला चाटून गेल्याने जखमी बीड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक; वाचा, काय आहे कारण

या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवलं होतं. त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का? असं म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असं म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली. तसंच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु, ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले.

नेमकं प्रकरण काय? बीड हादरलं, अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळेंची गोळ्या झाडून हत्या, एक जण जखमी

परळीमध्ये रात्री झालेल्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये घडली. या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गीते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत.

follow us

वेब स्टोरीज