बीड हादरलं, अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळेंची गोळ्या झाडून हत्या, एक जण जखमी

बीड हादरलं, अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळेंची गोळ्या झाडून हत्या, एक जण जखमी

Beed News : बीडमधील परळीहरात धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेले सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

‘…ते दिसले अन् मी घाबरून तिथून पळ काढला’; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

प्राथमिक माहितीनुसार, परळीतील बँक कॉलनीत ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचे समर्थक बापू आंधळे यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी बापू आंधळे यांच्यावर पाच फायर राऊंड केले. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परळी तालुका हादरला असून पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करत आहेत. दरम्यान, हा गोळीबार नेमका कशामुळे झाला आणि कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

T20 World Cup 2024 : सूर्यकुमार यादव पुन्हा फ्लॉप! खराब कामगिरीने चाहते निराश 

मरळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलवर बापू आंधळे निवडून आले होते. त्यानंतर ते अजित पवार गटात दाखल झाले होते. दरम्यान, गोळीबार कोणी केला याचा तपास पोलीस करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज