‘…ते दिसले अन् मी घाबरून तिथून पळ काढला’; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

‘…ते दिसले अन् मी घाबरून तिथून पळ काढला’; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंन (Raj Thackeray) नुकतीच अमेरिकेमधील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी राज ठाकरेंनी काही किस्सेही सांगितलं.

‘आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जायची वेळ…’; नाना पटोलेंचा खोचक टोला 

या मुलाखतीत त्यांना तुम्ही नेमकं कुणाला घाबरता? असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लग्नापूर्वी मी आणि शर्मिला एका ठिकाणी फिरायला गेलो होतो. त्यावेळी माझ्या सासऱ्यांना म्हणजे मोहन वाघ यांना शर्मिला आणि माझ्यातील प्रेमसंबंधाबाबत माहीत नव्हते. रात्री अडीच-तीनच्या दरम्यान, मी शर्मिला यांना सोडायला त्यांच्या घरी सोडायला गेलो. तेव्हा गेटजवळ कोणीतरी फिरताना दिसलं. तेव्हा तिने मला तिथं बाबा आहेत, असं सांगितल. ती 31 डिसेंबरची पहाट होती. त्यावर मी तिला सांगितलं की, बाबा नाहीत, तिथे वॉचमन आहे. पण ते शर्मिला यांचे बाबा होते, तेव्हा घाबरून तिथून पळ काढला, माझ्या आयुष्यातला हा एकमेव प्रसंग असा आहे, की मी पळून गेलो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

‘बापू’ ने सावरला भारताचा डाव! अक्षर-विराटच्या जोडीने केली कमाल, आफ्रिकेला 177 धावांचे लक्ष्य 

यावेळी बोलतांना त्यांनी पुणे पोर्शे कार प्रकरणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, जेव्हा ही घटना घडली आणि प्रकरण न्यायालयात गेलं. तेव्हा न्यायाधिश त्या मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगतात, हे कोणते न्यायाधीश? हे सगळ उगाच घडत नाही. पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

ही कोणती लोकशाही ?
पदवीधर मतदारसंघ यातून आमदार निवडून येतो. जो उमेदवार असतो, त्याला पदवीधर झालेली माणसं मतदान करतात. शिक्षित व्यक्ती रांगेत उभा राहून त्या व्यक्तीला मत देतो. पण, पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारी फॉर्मवर उमेदवाराची सही किंवा अंगठा असं लिहिले असते, यावरून काय वाटणार? म्हणजे तो उमेदवार शिक्षित असावा अशी अट नाही. पण त्याला मत देणारी माणसं शिकलेली पाहिजेत. ही कसली लोकशाही?, असा सवाल त्यांनी केला. माणूस विचारांनी तरूण असावा. भारतात लोकशाही आहे असे म्हणतो, पण भारतात लोकशाहीच नाहीये. कारण, माणूस केवळ सुशिक्षित असून चालत नाही तर सुज्ञ असावा लागतो. तिथंच लोकशाही नांदते, असंही राज ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज