Download App

पहाटेच्या शपथविधीपासून एक फूल दो कॉंटेची थेरं; राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई : मनसे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (raj thackeray) यांचा शिवाजी पार्कवर (Shivaji Park)गुढीपाडवा मेळावा (Gudipadwa Melava)सुरु आहे. त्यामध्ये राज ठाकरेंसह त्यांच्या विविध नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जारदार टीका केली आहे. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)भाजपसोबत केलेली युती तोडण्यापासून तर भाजप राष्ट्रवादीचं (NCP)पहाटेचं सरकार स्थापन करणे तसेच महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi sarkar)स्थापन करण्यापर्यंतच्या घडलेल्या घटणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, चार 2019 ची ती निवडणूक आकडेवारी आली. त्यानंतर एकत्र लढवून युतीमध्ये निवडणूक लढवून त्यानंतर शिवसेनेनं सांगितलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, अडीच वर्षाचा मुख्यमंत्री तुम्ही मान्य करा. निवडणुकीमध्ये हे बोलले होतात का? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला.

काळी गुढी उभारून शेतकऱ्यांनी केला कृषिमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या व्यासपिठावर, अमित शाहांच्या व्यासपिठावर बसून ते सांगत होते की, पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. त्यावेळी आक्षेप का नाही घेतला असाही सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला. ज्यावेळी तुमच्या लक्षात आलं की, शिवसेनेशिवाय भाजपचं सरकार बसणार नाही, हे लक्षात आलं त्यानंतर या हे सुरु केलं की, अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद द्या नाहीतर आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही.

मग ज्या लोकांनी युती म्हणून तुम्हाला मतदान केलं त्यांचं काय? त्याच्यानंतर तुम्ही सगळे खेळ खेळणार? त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढलात कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन मुख्यमंत्रिपद घेतलं. त्यांच्याबरोबर कारभार केला.

त्याच्याआधी भाजपने अजित पवारांबरोबर शपथविधी केला हे काय चाललंय काय? सकाळी पहाटेचा शपथविधी करायचा अजित पवारांबरोबर आणि मग काकाने डोळे वटारले मग ते प्रेमप्रकरण फिसकटलं. मग दुसरीकडे काहीतरी चालू होतं एक फूल दो कॉंटे. मग ते सगळं जमलं. हे थेरं यांना करण्यासाठी म्हणून तुम्ही करता का? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थितांना केला.

गेल्या गुढीपाडव्याला मी जे बोललो मग जूनमध्ये झालं ते. अलिबाबा आणि चाळीसजण गेले. त्यांना चोरफक्त मला म्हणता येत नाही कारण ते चोर नाहीत. यांनाच कंटाळून गेले. या कोविडच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाला भेटायला तयार नव्हते. त्यावेळी एक आमदार भेटायला गेले होते त्यांच्या मुलासोबत, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुलाला बाहेर उभा केलं होतं. कोविड आहे म्हणून का मुलाने काय होणार होतं? असेही ते यावेळी म्हणाले.

कोणालाच भेटायला तयार नव्हते मग आता अचानक बाहेर पडायला लागले. पुढे 21 जूनला कळालं की, एकनाथ शिंदे आमदार घेऊन सुरतला गेले. त्यानंतर गुवाहाटीला गेले, त्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत, अशा प्रकारची चौफेर टीका यावेळी राज ठाकरेंनी केली आहे.

Tags

follow us