काळी गुढी उभारून शेतकऱ्यांनी केला कृषिमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

काळी गुढी उभारून शेतकऱ्यांनी केला कृषिमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

अहमदनगर : राज्यात सगळीकडे गुढीपाडव्याचा (Gudipadwa) उत्साह आहे. सर्वजण मोठ्या आनंदात गुढीपाडवा साजरा करत आहेत. पण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) सरकारविरोधात काळी गुढी उभारून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

आज एकीकडे मराठी नववर्षाचा पहिला सन गुढीपाडवा सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली पिके उध्दवस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अवकाळी पावसाने आणि गारपीटीने पिके भुईसपाट झाल्यानं शेतकरी हताश आहे.

राज्य सरकारने पिकांचे पंचनामे करू असं सांगितलं तरीही अद्याप पिकांचे पंचनामे केले नाहीत. नाफेड अंतर्गत कांद्याची खरेदी करू असं सरकारने आश्वासन दिलं होतं. मात्र, अजूनही बऱ्याच ठिकाणी नाफेडद्वारे कांदा खरेदी सुरू झाली नाही. सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर केला नाही. सरकार फक्त आश्वासने देत आहे. याचाच निषेध म्हणून अहमदनगर तालुक्यातील तांदळी वडगावच्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ काळी गुढी उभारली. आणि सरकारचा निषेध केला.

अमित ठाकरे श्रोत्यांमध्ये बाळ नांदगावकरांनी त्यांना व्यासपीठावर बोलावले..

शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी बोलतांना सांगितलं की,सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकही सन शेतकऱ्याला आनंदाने साजरा करता येत नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत. यातील सर्वात जास्त आत्महत्या या कृषीमंत्री सत्तार यांच्या मतदार संघात होत आहेत. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालं नाही, पिक विम्याचा एक रुपयाही भेटला नाही. कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही. त्यामुळे बॅंकाकडून घेतलेलं कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न आहे. कितीदा तरी आम्ही सरकारला निवेदने दिली. मात्र, सरकारकडून शेतकरी प्रश्नांची दखल घेतल्या जात नाही. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाला केवळ केराची टोपली दाखवली जाते, ही खंत त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्नांवर सरकारने शक्य तेवढ्या लवकरात लवकर तोडगा काढवा. अन्यथा शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.

राज्य सरकारने कांदाला ३ हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी करावा. केंद्र सरकारने कायम स्वरूपी निर्यात धोरण सुरु ठेवावे व सर्व शेतमालाला हमीभाव द्यावा. मार्च २०२३ अतिरुष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करावेत. कापसाला प्रति क्विंटल 11 हजार रुपये भाव देण्यात यावा. खरीप २०२२ च्या अतिवृष्टीचे अनुदान त्वरित द्यावे, अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तर यांनी शेतकरी आत्महत्येसंदर्भात जे वक्तव्य केलं होतं, त्याचा निषेधही केला.

दरम्यान, सरकारने शेतीला योग्य हमीभावा द्यावा, शाश्वत निर्यात धोरण लागू केले आणि पायाभूत सुविधा म्हणून वीज दिली, तर शेतकऱ्यांवर आत्मत्या करण्याची वेळ येणार नाही, असं शेतकरी यशवंत ठोंबरे यांनी सांगितलं.

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube