अमित ठाकरे श्रोत्यांमध्ये बाळ नांदगावकरांनी त्यांना व्यासपीठावर बोलावले..

अमित ठाकरे श्रोत्यांमध्ये बाळ नांदगावकरांनी त्यांना व्यासपीठावर बोलावले..

Mumbai : ‘अमितजी, तुम्ही आमचे नेते आहात. तुम्ही वर व्यासपीठावर येऊन बसा. तुमचा हा विनम्रपणा इतरांनीही घेतला तर खूप बरे होईल, तुम्ही आता व्यासपीठावर येऊन बसा, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांत बसलेल्या अमित ठाकरे यांना केली. मग अमित ठाकरे यांनाही नांदगावकरांची विनंती नाकारता आली नाही. ते उठले आणि व्यासपीठावरील खुर्चीवर येऊन बसले. हा प्रकार सभेस उपस्थित असलेल्या लाखो लोकांसमोर घडला. त्यांनीही टाळ्या वाजवत त्यास दाद दिली.

यानंतर नांदगावकर यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, की राज ठाकरे विरोधी पक्षात असले तरी ते काय करू शकतात याची तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला काय माणसं फोडायची ती फोडा पण मनसेची माणसे फोडण्याचे पाप तुम्ही करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही दमानं बोलाल पण इकडे टायगर जोमाने येणार आहे.

वाचा : Raj Thackeray जनतेच्या मनातील भावी ‘मुख्यमंत्री’; मनसेची बॅनरबाजीतून बोचरी टीका

लव्ह जिहाद विरोधात आता भूमिका घ्यावी लागेल. सरकारला विनंती की लव्ह जिहाद विरोधी कायदा तातडीने आणा. नाहीतर राज साहेब आहेतच. त्यामुळे काळजी करू नका, असे नांदगाावकर म्हणाले. लोकं आता कंटाळली आहेत या राजकारणाला. त्यामुळे ते आता म्हणतात बस झाले. भविष्यात आपणच विजयी होणार आहोत याची खात्री बाळगा असेही नांदगावकर म्हणाले.

दरम्यान, याआधी मनसेचे पदाधिकारी अविनाश अभ्यंकर यांनीही उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की मुंबई महापालिकेत शिवसेना 25 वर्षांपासून सत्तेत आहे. पण मिठी नदी त्यांना काही स्वच्छ करता आली नाही. असा महापालिकेचा कारभार असतो का.

Raj Thackeray : सौदीत भोंगे बंद होतात… मग भारतात मोदी का करत नाही?

राज ठाकरे यांच्या मनसे पक्षानेच मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले. मराठी चित्रपटांसाठी प्राईम टाईम मिळवून दिला. मराठी भाषेसाठीही आंदोलन केले. तसेच टोलनाके बंद करण्यासाठीही आंदोलन केले. तेव्हा राज साहेबांचा अपमान करताना त्यांना लाज वाटली पाहिजे. आमचे पाच नगरसेवक तुम्ही पळवले त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही  का, असा सवाल त्यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube