Raj Thackeray जनतेच्या मनातील भावी ‘मुख्यमंत्री’; मनसेची बॅनरबाजीतून बोचरी टीका
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांची जाहीर सभा मुंबई येथील शिवाजी पार्क आज ( Raj Thackeray) परिसरात पार पडणार आहे. गुढी पाडव्यानिमित्त मनसे (MNS Gudi Padwa Melava ) द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे. सभेअगोदरच मनसेने जोरदार बॅनरबाजी करण्यास सुरवात केली आहे. खास म्हणजे शिवसेना भवन कार्यालयासमोर मनसेने बॅनर झळकावले आहे.
महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ असा साजरा होतो ! 🧡 pic.twitter.com/rVKuAVJwsH
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 21, 2023
या बॅनरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. थेट शिवसेना भवनासमोर हा बॅनर लावल्याने मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, आजच्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांच्या आजच्या सभेमध्ये मनसेकडून जबरदस्त ब्रँडींग करण्यात आले आहे. सोशल मीडियावर टीझर आणि पोस्टर्स लॉन्च करण्यात आली. गेल्या काही काळापासून महारष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. यावर राज ठाकरे यांनी विशेष भाष्य केले नव्हते. राज ठाकरे यांनी मधल्या काळात एक मुलाखतमध्ये सांगितलं होत. त्यावेळी त्यांनी आपण सध्या काहीच बोलणार नाही. जे काही बोलाचे ते गुढीपाडव्याला शिवाजी पार्क मैदानातून बोलेन असे सांगितलं होते.
हवामानाचा मूड आजही बदलणार? हवामान विभागाने सांगितलं…
यामुळे राज ठाकरे यांच्याकडून आजच्या सभेची उत्सुकता वाढविण्यात आली. विशेष म्हणजे ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन पार पडला. या कार्यक्रमात देखील राज ठाकरे विशेष काहीच बोलले नव्हते. मी टीजर, पोस्टर काहीच लॉन्च करणार नाही. जे काही बोलायचे आहे ते थेट शिवाजी पार्क येथून बोलेन असे राज ठाकरे यावेळी म्हणाले होते.
राज ठाकरे यांनी या अगोदर अनेक भूमिका घेतल्या आहेत. अलिकडील काळात मशिंदीच्या भोंग्यांवरुन राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही सर्वात चर्चेत आली. या भूमिकेवरुन राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. शिवाय शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंड झाले. शिवसेना हे नाव आणि चिन्हही एकनाथ शिंदे गटाला बहाल करण्यात आले. यामुळे उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका बसला. या पार्श्वभूमीवर राज्यात झालेले सत्तांतर, पक्षीय राजकारण, राजकारणाची पातळी, विविध नेत्यांची वक्तव्ये, राज्याचा विकास आणि संस्कृती यावर राज ठाकरे काय बोलणार याबाबत सर्वांना उत्सुकता निर्माण झाली.