Download App

उद्धव ठाकरे यांच्या एका सभेने भाजप घाबरले : नाना पटोले यांचा दावा

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या खेड मधील एका सभेने भाजप घाबरले आहे. आता आपल्या सर्वाना अशाच सभा कराव्या लागणार आहेत ज्यामुळे भाजप अजून घाबरून जाईन. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला राज्यातील जनतेसमोर एक जुडीने जावं लागणार आहे. आपल्याला आपली एकी विरोधकांना दाखवणे आता गरजेचे आहे. ज्या पद्धतीने आपण पुण्यातील पोट निवडणुका लढलो त्या पद्धतीने आपल्याला काम करावे लागणार आहे.

पुढे बोलताना नानांनी मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार रोवला गेला. त्या महाराष्ट्रसह देशातून भाजपाची हकालपट्टी व्हावी असा संकल्प यानिमित्ताने करायचा आहे. लोकशाहीच्या सर्व व्यवस्था मोडून काढण्याचे काम सध्या या देशात सुरु आहे. मोदींचे आणि अदानींचे काय संमंध आहेत हे साऱ्या देशाला माहित आहेत. मोदी आणि अडाणी मिळून देशाला लुटत आहेत. LIC मधील लोकांच्या पैशाची उधळपट्टी मोदी आपल्या मित्रांसाठी करत आहेत. अडाणी आणि मोदी मिळून जनतेचे पैसे लुटत आहेत. असा आरोप देखील यावेळी नानांनी केला.

Uddhav Thackeray यांचं ठरलं : पदरात काही नाही पडले तरी भाजपशी युती नाही! 

देशातील लोकसभेत आणि राज्यसभेत आमच्या नेत्यांना बोलू दिल जात आणि मागच्या आठवड्यात राहुल गांधी आणि मालिकाअर्जुन खर्गे यांचे भाषण पटलावरून काढून टाकले. त्यामुळे असे जाणवत आहे कि या मोदींनी आणि भाजपने देशात हुकूमशाही आणली आहे.

यादेशात आता भाजप आणि मोदींनी लोकशाही शिल्लक ठेवली नाही, BBC बाबत बोलताना नाना म्हणाले एक आंतरराष्ट्रीय चॅनल देखील आपल्या देशात बॅन केलं जात आहे, म्हणजे देशात लोकशाही राहिली नसून आता हुकूमशाही आलेली आहे. असा टोला मोदींना लगावला. जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा मालिन करण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भाजपने केलं आहे.

Tags

follow us