Action on Milk Adulteration : गेल्या पाच ते सहा वर्षापासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी अमिया फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा ६०० गोण्या असलेला साठा अन्न सुरक्षा प्रशासन व पोलिसांनी धाड टाकुन जप्त केल्याची कारवाई आज पहाटे करण्यात आली. (Milk) दरम्यान, या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आलं असून अंबादास पांडुरंग चौधरी (रा. टाकळी अमिया) असं त्याचं नाव आहे.
खाजगी कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता; भारतात BSNL 5G नेटवर्कची चाचणी झाली यशस्वी
पावडरचा मोठा साठा
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी याचं कडा येथील टाकळी अमिया रोडलगत साईदत्त एंटरप्राययजेस नावाने दुकान व लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन आहे. गोपनिय माहितीच्या आधारे अन्न व पोलीस प्रशासनाने आज पहाटे या ठिकाणी धाड टाकली. गोडाऊनची पाहणी केली असता भेसळयुक्त दुधाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे, अनुराधा भोसले, सहाय्यक आयुक्त कांबळे, आष्टीचे पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस हवालदार बबुशा काळे, पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव अंमलदार मजरूद्दीन सय्यद, सचिन गायकवाड, दिपक भोजे, सचिन पवळ, महिला अंमलदार जिजाबाई आरेकर, अर्चना आरडे, यानी केली आहे.
भारतीयांना इंटरनेटचं वेड! दिवसातले पावणे सात तास ऑनलाइन; रिपोर्टमधून खुलासा
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवस उगवायच्या आत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. दरम्यान, त्यांनी यंत्रेनेला याबाबद कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. तसंच, जिल्ह्यात किती ठिकाणी असे साठे आहेत याबाबतही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, आष्टी तालुक्यात इतर कुठल्या ठिकाणी असा प्रकार चालतो का हे पाहण्याचेही आदेश जिल्हाधिकारी पाठक यांनी दिले आहेत.