World Milk Day | विश्व दूध दिनाचं महत्व काय? जाणून घ्या इतिहास अन् दुधाचे फायदेही..

World Milk Day | विश्व दूध दिनाचं महत्व काय? जाणून घ्या इतिहास अन् दुधाचे फायदेही..

World Milk Day 2024 : आज जागतिक दूध दिवस. संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य (World Milk Day 2024) आणि कृषी संघटनेने 1 जून 2001 पासून जागतिक दूध दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जगभरातील लोकांच्या आहारात दुधाचा समावेश आहे. दुधाला आहाराच्या रूपात मान्यता देण्याचा उद्देश यामागे होता. दूध आणि डेअरी उत्पादनाच्या फायद्यांना अधिक चालना देणारे उपक्रम आणि अभियानाच्या माध्यमातून जागतिक दूध दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. दूधाचे मानवी आरोग्यासाठी वेगळेच महत्व आहे. त्यामुळेच निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांकडून आहारात दुधाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. आज जागतिक दूध दिवस आहे त्यानिमित्ताने हा दिवस का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय आहे, दूध पिण्याचे काय फायदे होतात याची माहिती घेऊ या..

का साजरा केला जातो जागतिक दूध दिवस

दूध हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या आहारात असतो. एफएओच्या वेबसाईटनुसार जगभरात दूध आणि डेअरी क्षेत्राचे योगदान अधोरेखित करणे हा या दिवसामागचा उद्देश आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिवस साजरा केला जातो.

या दिवसाचं महत्त्व काय

दुधाचं महत्व काय आहे हे लोकांना समजावून सांगण्यासाठी जनजागृती करणे महत्वाचे आहे. आपल्या रोजच्या आहारात आपण दुधाचा समावेश करतो. दूध हा असा एकच पदार्थ असेल जो आहारात बराच काळ घेतला जाऊ शकतो. त्यामुळे जागतिक दूध दिनी दुधाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. जागतिक दूध दिवस दरवर्षी एका खास थीमवर आधारित असतो. या थीमच्या माध्यमातून जगभरात जनजागृती केली जाते.

सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार; Amul Milk दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ

राष्ट्रीय दूध दिवस

भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला जातो. धवल क्रांतीचे जनक डॉ वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त देशभरात हा दिवस साजरा केला जातो. डॉ. कुरियन यांना मिल्क मॅन म्हणूनही देशात ओळखले जाते. 1970 मध्ये कुरियन यांनी धवल क्रांतीची सुरुवात केली होती. याचा उद्देश देशात दूध उत्पादनात वाढ करण्याचा होता. डॉ. कुरियन 1965 ते 1998 या काळात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी देशात प्रत्येक ठिकाणी दूध उत्पादनात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत आज जगात सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत पोहोचला आहे.

दूध पिण्याचे पाच फायदे

रोज दुधाचे सेवन केल्याने शरीर आणि आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. दुधात कॅल्शियम असते त्यामुळे दात आणि हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. एक कप दुधातून 285 मिलिग्रम कॅल्शियम शरीराला मिळते.

शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास दुधामुळे मदत मिळते. रोग प्रतिकार शक्ती चांगली असल्याने आजार जवळ फिरकत नाहीत. दुधात इम्यूनिटी बुस्टींग व्हिटॅमिन, प्रोटीन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि झिंक मुबलक प्रमाणात असते.

Milk Benefits: त्वचेला चमकदार बनवण्यापासून ते लठ्ठपणा टाळण्यासाठी दूध पिण्याचे अनेक फायदे

रोज दूध पिल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तुम्ही आहारात कमी फॅट असलेले दूध किंवा फॅट फ्री दूध घेऊ शकता. दुधापासून तयार केलेले पदार्थही आहारात घेऊ शकता. दूध कार्डीयोवस्कुलर आजार आणि रक्तदाब कमी करण्यासही मदत करू शकते.

कच्चे दूध शरीरासाठी अनेक अर्थांनी फायदेशीर आहे. कच्चे दूध पिल्याने शरीराला प्रोटीन, चांगले बॅक्टेरिया आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन मिळतात. दूध घेतल्याने इन्फेक्शन आणि अलर्जीचा धोकाही बऱ्यापैकी कमी होतो.

दूध दररोज घेतल्याने शरीराची जास्त कॅलरी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. हे एका अर्थाने चांगले आहे. ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या कमी होऊ शकते. वजन घटवण्यासाठी दूध फायदेशीर आहे असे अनेक तज्ज्ञ सांगतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज