Download App

शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात, 2 गाड्या एकमेकांवर धडकल्या

शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांर आदळ्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Sharad Pawar Car Accident : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यात सभांचा धडाका सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे देखील पायाला भिंगरी लावून राज्यात फिरत आहेत. ठिकठिकाणी ते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघा झाल्याची माहिती आहे

Aparshakti Khurana दिसणार वाणी कपूर, परेश रावलसोबत; चित्रपट लवकरच येणार… 

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांर आदळ्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यावल तालुक्यातील भुसावळ-यावल रस्त्यावर हा अपघात झाला.

कॉंग्रेसने कलम 370 अनौरस बाळासारखं सांभाळलं; रत्नागिरीतून अमित शाहांचे टीकास्त्र 

शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळला जात असताना हा अपघात झाला. भुसावळकडे जात असताना त्यांच्या वाहनासमोर स्पीड ब्रेकर आल्याने वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी केला होता. मात्र पाठीमागून येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज न आल्याने ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाने समोरिल वाहनास जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठं नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.

किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांचा अपघात
आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबीयांच्या गाडीला शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबीयांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा अपघात झाला. या अपघातात किरण सरनाईक यांचा पुतण्या रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

follow us