Aparshakti Khurana दिसणार वाणी कपूर, परेश रावलसोबत; चित्रपट लवकरच येणार…

Aparshakti Khurana दिसणार वाणी कपूर, परेश रावलसोबत; चित्रपट लवकरच येणार…

Aparshakti Khurana will appear with Wani Kapoor and Paresh Raval : अपारशक्ती खुराणा ( Aparshakti Khurana ) जो कायम वैविध्यपूर्ण चित्रपटासाठी ओळखला जातो तो आता वाणी कपूर, ( Wani Kapoor ) परेश रावल ( Paresh Raval ) आणि शीबा चढ्ढा यांच्यासोबत ‘बदतमीज गिल’ या गिल कुटुंबाच्या कॉमेडी-ड्रामासाठी तयार होत आहे.

कॉंग्रेसने कलम 370 अनौरस बाळासारखं सांभाळलं; रत्नागिरीतून अमित शाहांचे टीकास्त्र

या चित्रपटात अपारशक्ती हा मुलगा वाणी ही मुलगी तर परेश रावल आणि शीबा चढ्ढा त्यांच्या पालकांची भूमिका साकारणार आहेत. नवज्योत गुलाटी दिग्दर्शित याच शूट बरेली आणि लंडन या दोन ठिकाणी होणार आहे. अपारशक्ती खुराणाने ‘ज्युबिली’, स्त्री’, ‘लुका छुपी’, ‘दंगल’ आणि इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये वैविध्यपूर्ण पात्रे साकारली आहेत परंतु आता हा अभिनेता या चित्रपटात काय काम करणार हे बघणं उत्सुकतेच असणार आहे.

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची, उद्धव ठाकरे नकली सेनेचे अध्यक्ष; अमित शाहांचा हल्लाबोल

दरम्यान आगामी हॉरर-कॉमेडी ‘स्त्री 2’ मध्ये अपारशक्ती ‘बिट्टू’ ची भूमिका पुन्हा साकारताना पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. याशिवाय खुराना ‘बर्लिन’ या चित्रपटातही दिसणार आहे, जो एका मूकबधिर तरुणाची कहाणी मांडतो, ज्याला गुप्तहेर म्हणून अटक केली जाते. ॲपलॉज एंटरटेनमेंटचा ‘फाइंडिंग राम’ हा डॉक्युमेंट्रीही त्याच्याकडे आहे.

नुकतच अपारशक्तीचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या अगोदर त्याचे ‘कुडिये नी’, ‘होर कोई नहीं’, ‘तेरा नाम सुनके’ हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर आता ‘बरबाद’ या नव्या गाण्याचं अनावरण त्याने केल आहे. बरबाद या रोमांचक गाण्याचं अनावरण. हरवून जा या मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यामध्ये. हे गाणं निर्माण यांनी लिहिलं आणि त्याला संगीत दिले आहे. निर्माण हे ते त्यांच्या मैं वेखाँ तेरी फोटो’ या गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे गाणं रिलीज होताच चाहत्यांनी त्यावर भरभरून कमेंट केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज