कॉंग्रेसने कलम 370 अनौरस बाळासारखं सांभाळलं; रत्नागिरीतून अमित शाहांचे टीकास्त्र

कॉंग्रेसने कलम 370 अनौरस बाळासारखं सांभाळलं; रत्नागिरीतून अमित शाहांचे टीकास्त्र

Amit Shah On Congress : काँग्रेसने (Congress) एखाद्या अनौरस बाळासारखं कलम 370 सांभाळलं. मोदींनी कलम 370 हटवून काश्मीरला भारताशी जोडण्याचे काम केले. सोनिया-मनमोहन यांच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ले होत होते. मात्र मौनी बाबा त्यावर काही बोलायचे नाहीत, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कॉंग्रेसवर टीका केली.

पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले? सुजय विखेंचा लंकेंना परखड सवाल 

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची सभा झाली. या सभेला उदय सामंत, दिपक केसरकर, आमदार नितेश राणे, शेखर निकम, चित्रा वाघ, निलेश राणे, किरण सावंत, सदानंद चव्हाण, शिल्पा पटवर्धन आदी नेते उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना शाह म्हणाले, कॉंग्रेसन कलम 370 हटवलं नाही. कॉंग्रेसने आणि शरद पवारांनी कलम 370 ला कायम विरोध केला. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदींनी कलम 370 हटवले. त्यामुळे काश्मीर कायमस्वरूपी भारतात आला, असं शाह म्हणाले.

बारामतीची निवडणूक भावनिक की विकासावर? कुणाच पारडं जड होतय? वाचा सविस्तर 

ते म्हणणाले, मला उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे की, मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांच्या पायाशी गेले, ते काय करत होते? काँग्रेस पक्ष आणि शरद पवार 370 हटवण्यास विरोध करत होते. राहुलबाबा संसदेत उभे म्हणाचे की, 370 हटवू नका. मी विचारलं का हटवायचं नाही, तर म्हणाले, काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. ५ वर्षे झाली, रक्ताची नदी सोडा कोणाची विरोध करायची हिंमत झाली नाही, असंही शाह म्हणाले.

शाह म्हणाले, उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे आहे की कलम 370 हटवण्यास विरोध करणारा काँग्रेस-राष्ट्रवादी हवा आहे? राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यापुढे शरणागती पत्करणारे महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत. सोनिया-मनमोहन 10 वर्षे सत्तेत राहिले. तेव्हा पाकिस्तानी देशात घुसत होते. मौनी बाबा मनमोहन सिंग दिल्लीत गप्प बसले होते. त्यांना व्होट बँकेची चिंता होती, अशी टीका शाह यांनी केली.

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असून उद्धव ठाकरे हे नकली सेनेचे अध्यक्ष आहेत, अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज