संविधान तोडण्याचे काम काँग्रेसनेचं केलं; नितीन गडकरींची घणाघाती टीका

संविधान तोडण्याचे काम काँग्रेसनेचं केलं; नितीन गडकरींची घणाघाती टीका

Nitin Gadkari On Congress : भाजपन (BJP) अबकी बार, चारशे पारचा नारा दिला आहे. यावरून विरोधक भाजपवर सातत्याने टीका करत आहे. संविधान बदलण्यासाठी, देशाचं नावं बलण्यासाठी भाजपला आपले चारशे पार हवंय, अशी टीका कॉंग्रेससह सगळेच विरोधक करत आहे. आता विरोधकांच्या या टीकेला नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) जोरदार प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसनेच (Congress) संविधान बदलण्याचं पाप केल्याचा आरोप त्यांनी केला.

Pm Narendra Modi : …तर बाबासाहेबांचं संविधान संपूर्ण भारतात लागू करण्याची हिंमत का नाही दाखवली? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज रामटेकमध्ये सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. यावेळी बोलतांना गडकरींनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत नागपूर शहराचा खूप विकास झाला आहे. मात्र विकासकामांमुळे आमच्यावर टीका करता येत नसल्याने आमचे विरोधक खोटा प्रचार करत आहेत. भाजपने देशात 400 जागा जिंकल्या तर ते देशाचे संविधान बदलतील, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र पंतप्रधानांसह महायुतीच्या प्रत्येक नेत्याचा असा विश्वास आहे की देशाचे संविधान आपल्यासाठी सर्वोच्च आणि अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे त्यात कदापि बदल केला जाणार नाही, असं गडकरी म्हणाले.

‘विरोधकांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार’; PM मोदींचा घणाघात 

पुढं ते म्हणाले, खऱ्या अर्थाने या देशाची राज्यघटना मोडण्याचे पाप या देशातील काँग्रेसनेच केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात या देशाची संविधानात सुमारे 80 वेळा बदल करण्यात आले. त्यामुळे हे पाप काँग्रेसनेच केल्याचा आरोप गडकरींनी केला.

ते म्हणाले, आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असे काही निर्णय घेण्यात आले की या देशातील लोकशाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती. काँग्रेसला गेल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात जो विकास साधता आला नाही, तो विकास या देशात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षांत झाला. या देशात आपण जात, धर्म, पंथ, वर्ण यापेक्षा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या पंतप्रधानांच्या घोषणेने आज आपला देश पुढे जात आहे, असेही गडकरी म्हणाले.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण जलद गतीने सरसावले असून आज जगातील तिसरी महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा मोदींच्या मागे उभे राहण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही गडकरींनी केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube