Yeh Jawaani Hai Deewani: ‘चल इश्क लढाये’ रणबीर समोर येताच दीपिकाच्या चेहऱ्यावर फुलली कळी

Yeh Jawaani Hai Deewani: ‘चल इश्क लढाये’ रणबीर समोर येताच दीपिकाच्या चेहऱ्यावर फुलली कळी

प्रेरणा जंगम

Yeh Jawaani Hai Deewani 10 Years: आज दिवसभर सोशल मिडीयावर (Social media) काही फोटो चर्चेत आले आहेत. हे फोटो सध्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग आहेत. ते फोटो म्हणजे ज्या रियुनियनची सगळेच वाट पाहत होते. ‘ये जवानी है दिवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani ) या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरुणाईला आकर्षित करणाऱ्या या सिनेमानी लोकप्रियता मिळवली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)


रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) केमिस्ट्री, आदित्य रॉय कपूर, कलकी कोएचलीन हे कलाकार, चित्रपटाची गाणी, डायलॉग, रोमँटिंक सीन (Romantic scene) या सगळ्यासाठी हा चित्रपट ओळखला जातो. याच चित्रपटाच्या कलाकारांनी 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केलय खास गेटटुगेदर. अयान मुखर्जी दिग्दर्शित ये जवानी है दिवानी या चित्रपटातील कलाकार आणि टीमने एकत्र येऊन सेलिब्रेशन केले आहे.

यावेळी चक्क एक्स कपल रणबीर कपूर आणि दीपिका देखील एकत्र दिसले. रणबीर, दीपिका, आदित्य आणि कलकी यांचे एकत्र फोटो तर सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय दीपिकाने देखील तिच्या सोशल मिडीयावर हे फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये तिने याच चित्रपटाचा डायलॉग देखील लिहीले आहे. ती लिहीते की, “यांदे मिठाई के डिब्बे की तरह होती है, एक बार खुला तो सिर्फ एक टुकडा नहीं खा पाओगे- नैना तलवार” या चित्रपटातील नैना आणि बनीची जोडी बॉलीवुडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे.

Kon Honaar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडणार बाप-लेकीचे अनोखे नाते

या गेटटुगेदरला कलाकारांसह अयान मुखर्जी, मनीष मल्होत्रा, करण जौहर, सिद्धार्थ रॉय कपूर, संगीतकार प्रितम आणि इतर मंडळी उपस्तित होती. या कलाकारांना एकत्र पाहुन पुन्हा चित्रपटाच्या आठवणींना उजाळा मिळालाय. रणबीर – दीपिकाची जोडी एकत्र पाहायला प्रेक्षकांना आवडतं. तेव्हा या गेट-टुगेदरच्या निमित्ताने दोघांना एकत्र पाहुन नेटकऱ्यांना देखील आनंद झाला आहे. शिवाय दोघांना पुन्हा चित्रपटात पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा देखील काही चाहत्यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube