Download App

बीड जिल्ह्यात पु्न्हा एकदा धाड..धाड; गेवराई शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलांवर गोळीबार

बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गेवराई शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलांवर गोळीबार केल्याची घटना काल सायंकाळी घडली

  • Written By: Last Updated:

Firing in Gevrai : गेवराई शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलांवर गोळीबार केल्याची घटना काल सायंकाळी घडली. रात्री उशिरा या महिलेला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. (Gevrai) या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. महिलेच्या छातीत गोळी असल्याचे समोर आले आहे. उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आलं आहे. शीतल कटमिल्ला पवार भोसले (वय २६) असं जखमी महिलेचे नाव आहे.

जखमी शीतल पवार भोसले हिला घेऊन रुचिका भोसले जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. शहागड येथून खरेदी करण्यासाठी गेवराईत आल्यानंतर गोळीबार झाला असा दावा त्यांनी केला. दरम्यान, वैद्यकीय तपासणी (एक्स रे) मध्ये महिलेच्या उजव्या छातीत गोळी असल्याचं निदान झालं. त्यामुळे शीतल पवारला संभाजीनगरला रेफर करण्यात आल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात आहे.

लातुरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण; मंत्री पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

दरम्यान, गेवराई येथे कुठंही गोळीबार झाल्याची माहिती मिळाली नाही. तसंच उप जिल्हा रुग्णालय गेवराई येथेही नोंद नाही. शितल व संदीप हे पती पत्नी असून, ते खामगाव येथून सोबत गेले होते. शीतल ही शहागड येथे राहते तिची आई वडील हे खामगाव येथे राहतात. सदर महिला हीचा जबाब घेणे करिता सहाय्यक पोलीस निरीक्षक लंके गेले असल्याचे प्रविणकुमार बांगर यांनी सांगितलं. मला माझे पती तसमच माझी सवत आम्ही आमचे घरगुती भांडण मिटवीत असताना माझ्या सवतीच्या भावाने तसेच बहिणीने मारहाण केली असून त्यावेळी माझा पती देखील हजर होता. परंतु मला गोळी कोणी मारली,

सदर घटना ही कुठे घडली या बाबत काही एक सांगत नाही, असं महिलेने संगीतले असून दवाखान्यातून सुटी झाल्यानंतर जबाब देणार असल्याचं सांगितल्याचं म्हटलं आहे. नातेवाइकांचा घाटीत गोंधळ; जखमीला पोलिसांचं संरक्षण बीडच्या गेवराई येथे गोळीबारात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र, तिचं नातेवाईकही घाटीत पोहोचल्याने दोन्हीकडील नातेवाईक आमनेसामने येऊन एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जखमी महिलेच्या संरक्षणासाठी ५ पोलीस कर्मचारी तैनात केल्याची माहिती बेमगपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.

follow us

संबंधित बातम्या